Know about the new President of India | भारताचे नविन राष्ट्रपती बद्दल जाणून घ्या.
नविन राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू यांच्या बद्दल माहिती
(Information about the new President Draupadi Murmu)
द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकून त्या भारताच्या पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती बनल्या आहेत.
ओडिशा या राज्यामधील पूर्वेकडील राज्यातील आदिवासी नेत्या द्रौपदी मुर्मू या भारतीय प्रजासत्ताकाच्या १५व्या राष्ट्रपती बनल्या आहेत.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ संपल्यानंतर म्हणजे २५ जुलै २०२२ रोजी द्रौपदी मुर्मू हे राष्ट्रपती पदाची शपथ घेतील.
मा. प्रतिभाताई पाटील यांच्यानंतर द्रौपदी मुर्मू या देशाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती बनल्या आहेत.
(Presidential Election Results 2022) 18 जुलै २०२२ रोजी सुमारे ४८०० संसद सदस्य आणि विविध विधानसभेच्या सदस्यांनी (खासदार व आमदार) राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये मतदान केले होते.
द्रौपदी मुर्मू हे भारतीय जनता पक्ष (BJP) च्या नेतृत्वाखालील सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार होते.
भाजप (BJP)चे माजी नेते व केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा हे विरोधी पक्षाचे उमेदवार होते.
राष्ट्रपतीपदाकरिता द्रौपदी मुर्मू यांच्या नामांकनानंतर मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या एक "महान राष्ट्रपती" असतील असा विश्वास व्यक्त केला आहे.
द्रौपदी मुर्मू यांनी १९९७ मध्ये रायरंगपूर नगर पंचायतमध्ये नगरसेवकपदाची निवडणूक जिंकून आपल्या राजकीय कारकिर्दीला त्यांनी सुरुवात केली होती.
द्रौपदी मुर्मू सन २००० आणि सन २००९ मध्ये ओडिशा या राज्यामधील मयूरभंज जिल्ह्यातील रायरंगपूर मतदारसंघामधुन भाजप (BJP) या पक्षाच्या तिकिटावर दोनवेळा विजयी झाल्या होत्या.
सन २००० ते सन २००४ च्या दरम्यान नवीन पटनायक म्हणून ओडिशा या राज्यामधील बिजू जनता दल आणि भाजप युती सरकारमध्ये त्यांना वाणिज्य, वाहतूक आणि नंतर मत्स्य आणि प्राणी संसाधन खात्यामध्ये मंत्री करण्यात आले होते.
द्रौपदी मुर्मू ह्या मे २०१५ मध्ये झारखंड या राज्याच्या ९ व्या राज्यपाल म्हणून वचनबद्ध होत्या. द्रौपदी मुर्मू यांनी सय्यद अहमद यांची जागा घेतली होती. झारखंड उच्च न्यायालयाचे तत्कालीन मुख्य न्यायाधीश वीरेंद्र सिंह यांनी द्रौपदी मुर्मू यांना पदाची शपथ दिली होती.
झारखंड या राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल होण्याचा मानही द्रौपदी मुर्मू यांच्याकडेच गेले आहे.
द्रौपदी मुर्मू ह्या भारतामधील पहिल्या राज्याच्या राज्यपाल बनलेल्या आदिवासी महिला आहेत.
द्रौपदी मुर्मू यांनी २४ जुन २०२२ रोजी त्यांचे नामांकन केले. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रस्तावक बनले आणि राजनाथ सिंह त्यांच्या नामांकनात समर्थक बनले.
द्रौपदी मुर्मू यांच्या स्वतः बद्दल (वैयक्तिक माहिती
(Information about Draupadi Murmu herself)
द्रौपदी मुर्मूचा यांचा जन्म २० जुन १९५७ रोजी ओडिशा राज्यामधील मयूरभंज या जिल्ह्यामधील बैदापोसी गावात झाला आहे. त्या सदया ६४ वर्षाच्या आहेत.
द्रौपदी मुर्मूच्या वडिलांचे नाव बिरांची नारायण तुडू असे आहे. द्रौपदी मुर्मूचे आजोबा आणि वडील त्यांच्या गावाचे म्हणजे बैदापोसीचे प्रमुख होते.
द्रौपदी मुर्मू यांनी सन १९७९ मध्ये रमादेवी महिला विद्यापीठ भुवनेश्वर येथून कला शाखेमधून पदवी प्राप्त केली आहे.
द्रौपदी मुर्मू या राजकारणामध्ये येण्याच्या अगोदर श्री अरबिंदो इंटिग्रल एज्यूकेशन अँड रिसर्च इंस्टीट्यूटमध्ये सहायक प्राध्यापक म्हणून होत्या.
द्रौपदी मुर्मू यांचे लग्न श्याम चरण मुर्मू यांच्याशी झाले आहे. त्यांना 2 मुले होती.पण नंतर त्यांच्या दोन्ही मुलांचा मृत्यू झाला. त्यांना सदया एक मुलगी आहे ती सध्या बँकेमध्ये नोकरी करते.
द्रौपदी मुर्मू यांनी ओरिसा राज्याच्या पाटबंधारे आणि ऊर्जा विभागामध्ये कनिष्ठ सहाय्यक म्हणून सुद्धा काम केले आहे.
द्रौपदी मुर्मू यांना मिळालेला पुरस्कार
(Award received by Draupadi Murmu)
द्रौपदी मुर्मू यांना २००७ मध्ये ओडिशा विधानसभेद्वारे सर्वोत्कृष्ट आमदारा करिता 'नीलकंठ पुरस्कार' प्रदान करण्यात आला होता.
द्रौपदी मुर्मूची राजकीय कारकीर्द
(Political career of Draupadi Murmu)
भारताच्या राष्ट्रपतींना मिळणारे वेतन,भत्ते
(Salary, Allowances of the President of India)
भारताच्या आता पर्यंतच्या राष्ट्रपतींची यादी
(List of Presidents of India till now)
सारांश (Summary)
आम्ही व आमची टीम असे गृहीत धरतो की आपल्याला New President of India भारताच्या राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू बद्दल सर्व माहिती सोप्या पद्धतीने समजली असेल. तरी सुद्धा आपल्याला भारताच्या राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू यांच्या बद्दल काही प्रश्न उदभवल्यास आम्हाला आमच्या ई-मेल आयडी mpscstudymaterial99@gmail.com किंवा कंमेंट्स च्या माध्यमातून आम्हाला आवश्य कळवा.आम्ही आपल्या प्रश्नाला तात्काळ उत्तर देण्याचा प्रयत्न करू व जर आपल्याला वरील भारताच्या राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू बद्दल माहिती उपयुक्त वाटली असेल तर आपल्या मित्रांना आवश्य शेअर करा.
Faq?
1. द्रौपदी मुर्मू या भारताच्या कितव्या राष्ट्रपति बनल्या आहेत ? उत्तर :- द्रौपदी मुर्मू या भारताच्या १५ व्या राष्ट्रपति बनल्या आहेत. 2. मा. प्रतिभाताई पाटील यांच्यानंतर द्रौपदी मुर्मू या देशाच्या कितव्या महिला राष्ट्रपति बनल्या आहेत ? उत्तर :- मा. प्रतिभाताई पाटील यांच्यानंतर द्रौपदी मुर्मू या देशाच्या दुसऱ्या राष्ट्रपति महिला बनल्या आहे. 3. भारताच्या पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती कोण आहेत ? उत्तर :- द्रौपदी मुर्मू ह्या भारताच्या पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती आहेत. 4. द्रौपदी मुर्मूचा यांचा जन्म कोणत्या तारखेला झाला ? उत्तर :- द्रौपदी मुर्मूचा यांचा जन्म २० जुन १९५७ या तारखेला झाला आहे. 5. द्रौपदी मुर्मू यांना २००७ मध्ये ओडिशा विधानसभेद्वारे कोणता पुरस्कार प्रदान करण्यात आला होता ? उत्तर :- द्रौपदी मुर्मू यांना २००७ मध्ये ओडिशा विधानसभेद्वारे सर्वोत्कृष्ट आमदारा करिता
'नीलकंठ पुरस्कार' प्रदान करण्यात आला होता. 👉👉Agniveer Syllabus 2022 & Agneepath Salary||अग्निवीर अभ्यासक्रम 2022
1 Comments
Imp information sir
ReplyDelete