New President of India Droupadi Murmu

 Know about the new President of India | भारताचे नविन राष्ट्रपती बद्दल जाणून घ्या.

new president of india draupadi murmu new president of india draupadi president of india draupadi president of india draupadi murmu new president of india who is next president of india

  नविन राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू  यांच्या बद्दल माहिती 
(Information about the new  President Draupadi Murmu)

  • द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकून त्या भारताच्या पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती बनल्या आहेत.

  • ओडिशा या राज्यामधील पूर्वेकडील राज्यातील आदिवासी नेत्या द्रौपदी मुर्मू या भारतीय प्रजासत्ताकाच्या १५व्या राष्ट्रपती बनल्या आहेत.

  • राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ संपल्यानंतर म्हणजे २५ जुलै २०२२ रोजी द्रौपदी मुर्मू हे राष्ट्रपती पदाची शपथ घेतील.

  • मा. प्रतिभाताई  पाटील यांच्यानंतर द्रौपदी मुर्मू या देशाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती बनल्या आहेत.

  • (Presidential Election Results 2022) 18 जुलै २०२२ रोजी सुमारे ४८०० संसद सदस्य आणि विविध विधानसभेच्या सदस्यांनी (खासदार व आमदार) राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये मतदान केले होते.

  • द्रौपदी मुर्मू हे भारतीय जनता पक्ष (BJP) च्या नेतृत्वाखालील सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार होते.

  • भाजप (BJP)चे माजी नेते व केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा हे विरोधी पक्षाचे उमेदवार होते.

  • राष्ट्रपतीपदाकरिता द्रौपदी मुर्मू यांच्या नामांकनानंतर मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या एक "महान राष्ट्रपती" असतील असा विश्वास व्यक्त केला आहे. 

  • द्रौपदी मुर्मू यांनी १९९७ मध्ये रायरंगपूर नगर पंचायतमध्ये नगरसेवकपदाची निवडणूक जिंकून आपल्या राजकीय कारकिर्दीला त्यांनी सुरुवात केली होती. 

  • द्रौपदी मुर्मू सन २०००  आणि सन २००९  मध्ये ओडिशा या राज्यामधील  मयूरभंज जिल्ह्यातील रायरंगपूर मतदारसंघामधुन भाजप (BJP) या पक्षाच्या तिकिटावर दोनवेळा  विजयी झाल्या होत्या. 

  • सन २०००  ते सन २००४ च्या  दरम्यान नवीन पटनायक म्हणून ओडिशा या राज्यामधील  बिजू जनता दल आणि भाजप युती सरकारमध्ये त्यांना वाणिज्य, वाहतूक आणि नंतर मत्स्य आणि प्राणी संसाधन खात्यामध्ये  मंत्री करण्यात आले होते.

  • द्रौपदी मुर्मू ह्या मे २०१५ मध्ये झारखंड या राज्याच्या ९ व्या राज्यपाल म्हणून वचनबद्ध होत्या. द्रौपदी मुर्मू यांनी  सय्यद अहमद यांची जागा घेतली होती. झारखंड उच्च न्यायालयाचे तत्कालीन मुख्य न्यायाधीश वीरेंद्र सिंह यांनी द्रौपदी मुर्मू यांना पदाची शपथ दिली होती.

  • झारखंड या राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल होण्याचा मानही द्रौपदी मुर्मू यांच्याकडेच गेले आहे. 

  • द्रौपदी मुर्मू ह्या भारतामधील पहिल्या राज्याच्या राज्यपाल बनलेल्या आदिवासी महिला आहेत.

  • द्रौपदी मुर्मू  यांनी २४ जुन २०२२  रोजी त्यांचे नामांकन केले. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रस्तावक बनले आणि राजनाथ सिंह त्यांच्या नामांकनात समर्थक बनले.

 द्रौपदी मुर्मू यांच्या स्वतः बद्दल (वैयक्तिक माहिती
(Information about Draupadi Murmu herself)

  • द्रौपदी मुर्मूचा यांचा जन्म २० जुन  १९५७  रोजी ओडिशा राज्यामधील  मयूरभंज या  जिल्ह्यामधील  बैदापोसी गावात झाला आहे. त्या सदया ६४ वर्षाच्या आहेत.

  • द्रौपदी मुर्मूच्या वडिलांचे नाव बिरांची नारायण तुडू असे आहे. द्रौपदी मुर्मूचे आजोबा आणि वडील त्यांच्या गावाचे म्हणजे बैदापोसीचे प्रमुख होते.

  • द्रौपदी मुर्मू यांनी सन १९७९ मध्ये रमादेवी महिला विद्यापीठ भुवनेश्वर येथून कला शाखेमधून पदवी प्राप्त केली आहे.

  • द्रौपदी मुर्मू या राजकारणामध्ये येण्याच्या अगोदर श्री अरबिंदो इंटिग्रल एज्यूकेशन अँड रिसर्च इंस्टीट्यूटमध्ये सहायक प्राध्यापक म्हणून होत्या.

  • द्रौपदी मुर्मू यांचे लग्न श्याम चरण मुर्मू यांच्याशी झाले आहे. त्यांना 2 मुले होती.पण नंतर त्यांच्या दोन्ही मुलांचा मृत्यू झाला. त्यांना सदया एक  मुलगी आहे ती सध्या बँकेमध्ये नोकरी करते.

  • द्रौपदी मुर्मू यांनी ओरिसा राज्याच्या पाटबंधारे आणि ऊर्जा विभागामध्ये कनिष्ठ सहाय्यक म्हणून सुद्धा काम केले आहे.

                        द्रौपदी मुर्मू यांना मिळालेला पुरस्कार 
(Award received by Draupadi Murmu)

  • द्रौपदी मुर्मू यांना २००७ मध्ये ओडिशा विधानसभेद्वारे सर्वोत्कृष्ट आमदारा करिता 'नीलकंठ पुरस्कार' प्रदान करण्यात आला होता.                                                 

  • president of india president meaning in marathi president in marathi president election results president of india 2022

                         द्रौपदी मुर्मूची राजकीय कारकीर्द

                (Political career of Draupadi Murmu)

अ.क्र. 

पासुन 

पर्यन्त 

 

१  

सन २०००  

सन २००४ 

ओडिशा राज्याच्या सरकारमध्ये राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) म्हणून परिवहन आणि वाणिज्य विभाग द्रौपदी मुर्मू यांनी सांभाळला.

२ 

सन २००२ 

सन २००४ 

ओडिशा राज्य सरकारचे राज्यमंत्री म्हणून पशुसंवर्धन आणि मत्स्यव्यवसाय विभाग द्रौपदी मुर्मू यांनी सांभाळला.

३ 

सन २००२

सन २००९  

द्रौपदी मुर्मू या BJP भाजपच्या (ST) एसटी मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्या होत्या.

४ 

सन २००६ 

सन २००९  

द्रौपदी मुर्मू या काळामध्ये भाजपच्या BJP एसटी मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष होत्या.

५ 

सन २०१३  

एप्रिल २०१५ 

द्रौपदी मुर्मू या काळामध्ये त्या  भाजपचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य होते.

६ 

सन २०१५ 

सन २०२१ 

द्रौपदी मुर्मू या झारखंडच्या मा. राज्यपाल होत्या.

 

         भारताच्या राष्ट्रपतींना मिळणारे वेतन,भत्ते

  (Salary, Allowances of the President of India)

मासिक वेतन 

पाच लाख रुपये (२०१६ मध्ये २०० टक्के वाढ झाली. याआधी मासिक दीड लाख रु वेतन मिळत असे. 

राष्ट्रपती निवृत्त झाल्यानंतर निवृतवेतन 

दीड लाख रूपये 

निवृत्तनंतर इतर लाभ 

सुसज्ज बंगला, दोन दूरध्वनि व एक मोबईलची मोफत सेवा, पाच खासगी कर्मचारी, कर्मचारी खर्चासाठी वार्षिक ६० हजार रुपये, सहकार्यासह मोफत विमान, रेल्वे प्रवास 

पत्नी किंवा पतीला सचिवालय सहाय्य निधी 

दरमहा ३० हजार रूपये 

मोफत निवासस्थान व वैदकीय सेवा कार्यालयीन खर्च 

एक लाख रुपये वार्षिक 

राष्ट्रपतीचे अधिकृत निवासस्थान 

राष्ट्रपती भवन 

राष्ट्रपती भवनाची भव्यता 

३४० खोल्या, दोन लाख चौरस फुट क्षेत्र 

राष्ट्रपतींना सुटीमद्धे जाण्याकरिता दोन अधिकृत ठिकाणे 

सिमल्यातील मशोब्रा आणि हैद्राबाद मधील बोलारम जगामध्ये कोठेही प्रवासाकरिता विमान व रेल्वे प्रवास मोफत असतो 

राष्ट्रपतींसाठी वाहन 

मर्सिडिस बेन्झ कंपनीची एस ६०० (डब्लु २२१) ही पुलमन गार्ड अलिशान मोटार 

राष्ट्रपतींच्या अधिकृत दौऱ्याकरिता 

चिलखत आवरण असलेली लिमोझिन गाडी राखीव 

सुरक्षेच्या कारणास्तव राष्ट्रपतींच्या ताफ्यातील मोटरिंची 

माहिती गोपनीय ठेवली जाते. 

राष्ट्रपतीच्या वाहनांवर क्रमांक नसतो 

त्या ऐवजी राष्ट्रीय चिन्हाची पाटी असते. 

राष्ट्रपतीच्या सुरक्षेची जबाबदारी 

त्यांच्या सुरक्षा रक्षकांवर असते. 

 

             भारताच्या आता पर्यंतच्या राष्ट्रपतींची यादी 

             (List of Presidents of India till now)

Sr.No.

Presidents  Name

from year 

until year 

Rajendra Prasad

1950

1952 

Sarvepalli Radhakrishnan

1962 

1967 

Zakir Hussain

1967 

1969 

VV Giri

1969 

1974 

Fakhruddin Ali Ahmed

1974 

1977 

Neelam Sanjiva Reddy

1977 

1982 

Zail Singh

1982

1987 

Ramaswamy Venkataraman

1987 

1992 

Shankar Dayal Sharma

1992 

1997 

10 

KR Narayan

1997 

20002 

11 

APJ Abdul Kalam

2002

2007 

12 

Prathiba Patil

2007 

2012

13 

Pranab Mukherjee

2012 

2017 

14 

Ram Nath Kovind

2017 

2022 

   

     सारांश (Summary)

आम्ही व आमची टीम असे गृहीत धरतो की आपल्याला New President of India भारताच्या राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू बद्दल सर्व माहिती सोप्या पद्धतीने समजली असेल. तरी सुद्धा आपल्याला भारताच्या राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू यांच्या बद्दल काही प्रश्न उदभवल्यास आम्हाला आमच्या ई-मेल आयडी mpscstudymaterial99@gmail.com किंवा कंमेंट्स च्या माध्यमातून आम्हाला आवश्य कळवा.आम्ही आपल्या प्रश्नाला तात्काळ उत्तर देण्याचा प्रयत्न  करू व जर आपल्याला वरील भारताच्या राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू बद्दल माहिती उपयुक्त वाटली असेल तर आपल्या मित्रांना   आवश्य शेअर करा.

Faq?

1. द्रौपदी मुर्मू या भारताच्या कितव्या राष्ट्रपति बनल्या आहेत ? उत्तर :- द्रौपदी मुर्मू या भारताच्या १५ व्या राष्ट्रपति बनल्या आहेत. 2. मा. प्रतिभाताई पाटील यांच्यानंतर द्रौपदी मुर्मू या देशाच्या कितव्या महिला राष्ट्रपति बनल्या आहेत ? उत्तर :- मा. प्रतिभाताई पाटील यांच्यानंतर द्रौपदी मुर्मू या देशाच्या दुसऱ्या राष्ट्रपति महिला बनल्या आहे. 3. भारताच्या पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती कोण आहेत ? उत्तर :- द्रौपदी मुर्मू ह्या भारताच्या पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती आहेत. 4. द्रौपदी मुर्मूचा यांचा जन्म कोणत्या तारखेला झाला ? उत्तर :- द्रौपदी मुर्मूचा यांचा जन्म २० जुन १९५७ या तारखेला झाला आहे. 5. द्रौपदी मुर्मू यांना २००७ मध्ये ओडिशा विधानसभेद्वारे कोणता पुरस्कार प्रदान करण्यात आला होता ? उत्तर :- द्रौपदी मुर्मू यांना २००७ मध्ये ओडिशा विधानसभेद्वारे सर्वोत्कृष्ट आमदारा करिता

'नीलकंठ पुरस्कार' प्रदान करण्यात आला होता. 👉👉Agniveer Syllabus 2022 & Agneepath Salary||अग्निवीर अभ्यासक्रम 2022 https://www.mpscstudymaterial.com/2022/07/agniveer-syllabus-2022-agneepath-salary.html

👉👉MHT CET 2022 Admit Card (Hall Ticket) Download Heare www.mpscstudymaterial.com

Post a Comment

1 Comments