Talathi Bharti Syllabus 2022|| (तलाठी भरती अभ्यासक्रम २०२२)
तलाठी या पदाबाबत संपूर्ण माहिती (Talathi Information in Marathi):-
मित्रांनो आपण तलाठी बद्दल थोडक्यात माहिती पाहु या. दिल्लीचे बादशहा शेर शाह सूरीच्या दरबारामध्ये राजा तोरडमल नावाचे भू-अभिलेख मंत्री होते. हे पुढे अकबराच्या दरबारातील नवरत्नांपैकी एक झाले. त्यांनी जमिनीसंबंधी कामाच्या व्यवस्थेकरिता पटवारी पद निर्माण केले. भारतातील ब्रिटिश राजवटीत १८१४ सालच्या अधिनियमाप्रमाणे ग्रामीण भागातले सरकारी हिशोब व दप्तर सांभाळण्यासाठी तलाठी (हिन्दीमध्ये पटवारी) या पदाची नव्याने निर्मिती करण्यात आली. सन १९१८ साली महाराष्ट्रामधील 'कुळकर्णी वतने' समाप्त केली गेली व पगारी तत्त्वावर तलाठी पदे सुरू करण्यात आले. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम ७(३) नुसार प्रत्येक सजाकरिता एक किंवा अधिक तलाठी नेमण्यात येतो. तलाठीची नेमणूक करण्याचे अधिकार संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यास आहेत. तलाठी पदाची निवड स्पर्धा परीक्षांद्वारे करण्यात येते. तलाठ्याच्या कार्यालयाला ‘सजा’ असे म्हणतात.तलाठी हा ग्रामीण मुलकी प्रशासनामधील ग्रामस्तरावरील महसूल खात्याचा वर्ग – ३ चा कर्मचारी असतो. म्हणजेच तलाठी हे गट ‘अ’ class a प्रकारचे पद आहे.तलाठीवर नजिकचे नियंत्रण सर्कल ऑफिसरचे (मंडल अधिकारी) व त्यानंतर तहसीलदारांचे असते.महसूल खात्याचे गावपातळीवरील दप्तर हा तलाठी सांभाळतो. जमीन महसूल संबधीत कोणताही अर्ज सर्वप्रथम तहसीलदार पाहतात. त्यावर योग्य तो निर्णय घेऊन मग तो पुढे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविला जातो.गावातील नमुना क्र. ७-१२, ८ अ इत्यादींशी तलाठी संबंधित असतात.
तलाठीची कार्य पद्धती (Working methods of Talathi)
जिल्हाधिकाऱ्यांनी गाव पातळीवर निश्चित केलेली नोंदणी पुस्तके आणि अभिलेख ठेवण्याचे कार्य तलाठी करतो.
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ नुसार गाव पातळीवरील महसूलविषयक कामांची जबाबदारी तलाठी पार पडतात.
गावस्तरावर महसूल, तगाई वसुली, दुष्काळ इत्यादी कामाशी तलाठी संबंधित आहे.
गावपातळीस्तरावर कुटुंबनियोजन कार्यक्रम यशस्वी करण्याची प्राथमिक जबाबदारी तलाठी वर असते.
गावपातळीस्तरावर जमीन महसूल थकबाकीदार आणि जमिनीच्या अधिकार पत्राची नोंद ठेवण्याची जबाबदारी तलाठीची असते.
गावपातळीस्तरावर पीक पाण्याची नोंद हा तलाठी करतो.
गावामधील महसूल गोळा करण्याचे अधिकार तलाठी यास आहेत.
गावपातळीस्तरावर शेतजमीनीचा आकार ठरविण्याचा अधिकार तलाठीस आहे.
गावामधील जमीनधारकांच्या नोंदी ठेवण्याचे काम तलाठी करत असतो.
तहसीलदाराने निश्चित केलेली पिकांची आणेवारी हा तलाठी राबवतो..
गावपातळीस्तरावर कौटुंबिक शिधापत्रिका (राशन कार्ड) वितरित करण्याचे किंवा वाटपकरण्याचे काम तलाठी पार पाडत असतो.
गावपातळीस्तरावर निवडणूक यंत्रणेतील एक घटक या नात्याने निवडणुकीसंदर्भात सोपवलेली कामे पार पाडण्याची जबाबदारी तलाठीवर असते.
तहसीलदार, जिल्ह्याचा महसूल अधिकारी किंवा पोलिस अधिकारी यांच्या आदेशानुसार गावपातळीस्तरावर मरणोत्तर चौकशीचे प्रतिवृत्त, फौजदारी प्रकरणातील जबानी व तपासणी इ. कामकाजाशी तलाठी संबंधित असतो.
तलाठ्याला गैरवर्तणुकीबद्दल शासन करण्याचे अधिकार उपजिल्हाधिकारी किंवा प्रांत अधिकाऱ्यास आहेत.
गावपातळीस्तरावर तलाठी दप्तरात महसूल खात्याशी संबंधित माहिती २१ प्रकारच्या गाव नमुन्यामध्ये ठेवण्यात येते.
तलाठ्याची कर्तव्ये Talathi duties
ग्रामीण भागाच्या नोंदवह्या अद्ययावत ठेवणे, दैनंदिन कार्यावर लक्ष ठेवणे, गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन शासन व जनता यांमधील दुव्याचे काम करणे हे एक तलाठ्याचे कर्तव्य आहे..
तलाठ्याला शासनाचा गाव पातळीवरील मूलभूत घटक म्हणून सरकार विविध परिपत्रके, शासन निर्णय, स्थायी आदेश, किंवा सूचना देत असते.
नैसर्गिक आपत्तीची माहिती मंडळ अधिकारी व तहसीलदारास देणे हे एक तलाठयाचे कर्तव्य आहे..
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाच्या कलम १५४ नुसार नोंद करणाऱ्याने किंवा जिल्हाधिकाऱ्यांने कळवलेल्या बदलांचे नोंदवहीत विवरण घेणे हे एक तलाठ्यानचे कर्तव्य आहे.0
जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार गावातील शिधापत्रिकांची (राशन कार्ड) सूची तयार करणे व ती गावकऱ्यांना उपलब्ध करून देणे.
तलाठी पासुन ते जिल्हाधिकारी पर्यन्त पदांची रचना Design of posts from Talathi to Collector
तलाठीची निवड प्रक्रिया Talathi selection process
तलाठी पदासाठी असणारी भरती ही सरळ सेवा पद्धतीने करण्यात येते..
याकरिता उमेदवारांना कोणत्याही प्रकारची मुलाखत ही द्यावी लागत नाही.
तलाठी या पदाची जागा गट क विभागातील जागा असल्याने परीक्षेचा स्तरही त्याप्रमाणे असतो.
तलाठी या पदाची परीक्षा जिल्हा निवड समिती मार्फत घेतली जाते. या पदाकरिता असलेल्या रिक्त जागांसाठी जिल्हा निवड समिती जाहिरात प्रसिद्ध करते आणि त्या नंतर उमेदवारांमार्फत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले जातात.
उमेदवारांनाकडून अर्ज मागविल्या नंतर उमेदवारांना बहुपर्यायी स्वरूपाची २०० गुणांची लेखी परीक्षा द्यावी लागते.
लेखी परीक्षा झाल्या नंतर जास्त मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांची जिल्ह्यानुसार मेरीट लिस्ट जाहीर करण्यात येते.
तलाठी होण्याकरिता शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा Educational Qualification and Age Limit for Talathi
राष्ट्रीयत्व: भारतीय
मराठी भाषेचे ज्ञान अवगत असणे आवश्यक आहे.
कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठामधुन परीक्षा उत्तीर्ण असावी.
उमेदवार संगणकविषयक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.(उदा. MSCIT वगैरे इत्यादि )
वयोमर्यादा: खुल्या प्रवर्गा करीता वयोमर्यादा १८ ते ३८ वर्ष (मागासवर्गीय ०५ वर्ष सूट, प्रकल्पग्रस्त /भूकंपग्रस्त, अपंग ०७ वर्ष वयोमर्यादे मध्ये सूट देण्यात येते.)
या पदाकरिता परीक्षा ही दिलेल्या वयोमर्यादेच्या आत कितीही परीक्षा देता येते..
तलाठी परीक्षेचा थोडक्यात आराखडा Brief outline of Talathi examination
तलाठी या पदाकरीता परीक्षा लेखी स्वरूपाची असते तसेच यातील प्रश्न हे बहुपर्यायी स्वरूपाचे म्हणजे ऑप्शन चे असतात.
तलाठी या पदाची लेखी परीक्षा ही एकूण 200 गुणांकरिता असते.
तलाठी या पदाच्या लेखी परीक्षेमध्ये १०० प्रश्न असतात आणि प्रत्येक प्रश्नाला दोन गुण दिले जातात.
तलाठी या पदाच्या परीक्षेमध्ये मराठी व्याकरण, इंग्रजी, अंकगणित व सामान्य-ज्ञान अशा चार विषयांचा समावेश या मध्ये असतो.
पेपरमध्ये प्रत्येक विषयाचे 25 प्रश्न असतात.
तलाठी या पदाचा लेखी पेपर सोडवण्याकरिता एकूण दोन तासाचा वेळ असतो.
तलाठी परीक्षा अभ्यासक्रमाची सविस्तर माहिती Detailed information of Talathi examination syllabus
तलाठी भरतीच्या प्रक्रियामधील अभ्यासक्रमामधील मराठी विषयाचा स्तर हा बारावीचा अभ्यासक्रमाप्रमाणे असतो तर इतर तीन विषयांचा स्तर हा पदवी अभ्यासक्रमाप्रमाणे असतो. तर मित्रांनो आपण तलाठी भरती अभ्यासक्रम (Talathi exam syllabus) विषयानुसार सविस्तरपणे खाली प्रमाणे पाहु या.
मराठी व्याकरण :- Marathi grammar
समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द
काळ व काळाचे प्रकार
विभक्ती
म्हणी
वाक्यप्रचारांचे अर्थ व उपयोग
शब्दसमुहाबद्दल एक शब्द
शब्दांचे प्रकार- नाम सर्वनाम, क्रियाविशेषण, क्रियापद विशेषण
संधी व संधीचे प्रकार
इंग्रजी व्याकरण :- English grammar
Synoms & anytoms
Sentence structure
Verbal comprehension passage
Spot the error
Question tag
One word substitutions
Use proper form of verb
Spellings
Proverbs
Phrases
Tense & kinds of tense
Vocabulary
अंकगणित आणि बुद्धिमत्ता:- Arithmetic and intelligence
बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार
मापनाची परिमाणे
चलन
काळ, काम, वेग संबंधित – उदाहरणे
घड्याळ
सरासरी
अंकमालिका
अक्षर मलिका
वेगळा शब्द व अंक ओळखणे
समसंबंध - अंक
अक्षर
आकृती
वाक्यावरून निष्कर्ष
वेन आकृती.
सामान्य ज्ञान:- General knowledge
महाराष्ट्राचा व भारताचा इतिहास
भारताच्या शेजारील देशांची माहिती
पंचायत राज व राज्यघटना
महाराष्ट्रातील समाज सुधारकांचे कार्य
रसायनशास्त्र
जीवशास्त्र
भौतिक शास्त्र
चालू घडामोडी:- Current Affairs
राजकीय
आर्थिक
सामाजिक
मनोरंजन
क्रीडा
आम्ही व आमची टीम असे गृहीत धरतो की आपल्याला तलाठी परीक्षेबद्दल आणि Talathi exam syllabus बाबत सर्व माहिती प्राप्त झाली आहे. आणि ती आपणास सोप्या पद्धतीने समजली आहे. तरी सुद्धा आपल्याला तलाठी परीक्षेबद्दल काही प्रश्न उदभवल्यास आम्हाला आमच्या ई-मेल आयडी www.mpscstudymaterial99@gmail.com किंवा कंमेंट्स च्या माध्यमातून आम्हाला आवश्य कळवा.आम्ही आपल्या प्रश्नाला तात्काळ उत्तर देण्याचा प्रयत्न करणार करू व जर आपल्याला वरील तलाठी परीक्षेबद्दल माहिती उपयुक्त वाटली असेल तर ज्यांना तलाठी परीक्षेची परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या मित्रांना शेअर करा जे-णे करून त्यांना देखील याचा फायदा होईल.
FAQ ?
Q.1 तलाठी भरती परीक्षे करीता किती टप्पे असतात. ?
Ans: तलाठी या पदाकरीता एकच परीक्षा घेण्यात येते.
Q2. तलाठी भरती परीक्षेची मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका कुठे मिळतील?
Ans: आमच्या Website वर पाहायला मिळतील.
Q3. तलाठी परीक्षेची मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका पाहणे आवश्यक आहे किंवा कसे ?
Ans: मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका पाहून सोडव्ल्यामुले आपल्याला अनुभव येतो. आणि आपला आत्मविश्वास वाढतो. पेपर सोडवितांना आपला वेळ सुध्दा वाचतो.
👉👉👉मेगाभरती विशेष - सरळसेवा भरती बाबत राज्य शासनाचा महत्वपूर्ण निर्णय !
👉👉👉“माझी कन्या भाग्यश्री योजना”||"Mazi Kanya Bhagyashree Yojana
👉👉👉 रोजगार हमी योजना 2022||Employment Guarantee Scheme 2022
0 Comments