“माझी कन्या भाग्यश्री योजना”||"Mazi Kanya Bhagyashree Yojana"
माझी कन्या भाग्यश्री योजना उद्देश काय आहे? (What is the purpose of my Kanya Bhagyashree scheme?)
मित्रांनो आपल्याला माहीतच आहे की, जगामध्ये असे बरेच लोक आहेत जे मुलींना एक ओझे समजतात आणि मुलींना मारतात आणि मुलींना उच्च शिक्षण घेऊ देत नाहीत. या करिता महाराष्ट्र सरकारने मुलींच्या आरोग्याचा दर्जा वाढविणे यासाठी माझी कन्या भाग्यश्री ही योजना दिनांक १ एप्रिल २०१६ पासून लागू केली आहे.मित्रांनो आता आपण “माझी कन्या भाग्यश्री” या योजनेचे स्वरूप पाहणार आहोत.
माझी कन्या भाग्यश्री योजनेचे स्वरूप कसे आहे.(What is the nature of my daughter's Bhagyashree scheme.)
या मध्ये प्रकार पहिला एकुलती एक मुलगी आहे व मातेने कुटुंबनियोजन केले आहे. आणि प्रकार दुसरा एक मुलगी आहे आणि मातेने दुसऱ्या मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्रक्रिया केलेली आहे. अश्या परिस्थितीमध्ये दोन्ही मुलींना प्रकार दोन चे लाभ देय राहतील. मात्र एक मुलगा व एक मुलगी अशी परिस्थिती असल्यास लाभ अनुज्ञय राहणार नाहीत.
माझी कन्या भाग्यश्री योजनेचे लाभाचे स्वरूप कसे आहेत ते पाहु.(Let's see what are the benefits of my daughter Bhagyashree scheme.)
या योजनेमध्ये लभाचे स्वरूप अश्या प्रकारे आहे की ०१) माझी कन्या भाग्यश्री ही योजना संपूर्ण राज्यभर राबविली जाणार आहे. २) मात्र एक मुलगी व एक मुलगा जन्मलेल्या असलेल्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. असे दोन प्रकारचे या योजनेचे स्वरूप आहे.
“माझी कन्या भाग्यश्री” या योजनेअंतर्गत यापूर्वीच्या सुकन्या योजनेचे लाभ कायम ठेऊन खालीलप्रमाणे अधिक लाभ देण्यात येणार आहे.ते लाभ आपण खाली तक्त्याप्रमाणे दिले आहे.
माझी कन्या भाग्यश्री योजनेची उद्दिष्टे खालील प्रमाणे (Objectives of my Kanya Bhagyashree scheme)
लिंग निवडीस प्रतिबंध करणे
बालिकेचा जन्मदर वाढविणे
मुलींच्या जीवनमानाच्या सुरक्षेबद्दल खात्री देणे
समाजामधील बालिकेचा शैक्षणिक प्रोत्साहन आणि समान दर्जा याकरिता कायमस्वरूपी सामुहिक चळवळ समाजामध्ये निर्माण करणे.
मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे
सामाजिक बदलाचे प्रमुख घटक जसे पंचायत राज संस्था, शहरी स्थानिक समित्या व स्थानिक स्तरावरील कर्मचारी यांना प्रशिक्षण देणे या कामामध्ये स्थानिक समुदाय, महिला मंडळे, महिला बचत गट, व युवक मंडळ यांचा सहभाग घेणे.
जिल्हास्तरावर, तालुकास्तरावर, आणि निम्नस्तरावर विविध संस्था व सेवा देणारे यांचा समन्वय घडवून आणणे
माझी कन्या भाग्यश्री योजनेची काही सर्वसाधारण नियम पाहुया.(Some general rules of my Kanya Bhagyashree scheme)
मित्रांनो वर आपण “माझी कन्या भाग्यश्री” योजनेची उद्दिष्टे पाहली. आता आपण “माझी कन्या भाग्यश्री” योजनेची काही सर्वसाधारण नियम पाहुया.पहिल्या “सुकन्या' योजनेचा समावेश नव्याने सुरु करण्यात आलेल्या 'माझी कन्या भाग्यश्री' या योजनेमध्ये करण्यात आल्यामुळे 'सुकन्या' योजनेतील असणाऱ्या सर्व अटी व शर्ती(नियम) “माझी कन्या भाग्यश्री” या योजनेमध्ये लागू करण्यात येत आहे.
‘माझी कन्या भाग्यश्री' ही योजना सर्व गटातील दारिद्रय रेषेखालील (BPL) तसेच दारिद्रय रेषेच्यावर (APL) (पांढरे रेशनकार्डधारक) कुटुंबात जन्मणाऱ्या अपत्यांपैकी दोन मुलींना लागू असेल.
या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या मुलीचे वडील हे महाराष्ट्र राज्याचे मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.इतर राज्याचे रहिवाशी असु नये..
‘माझी कन्या भाग्यश्री' या योजनेचा लाभ घेण्याकरीता अर्ज करते वेळेस बालिकेचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र (Birth Certificate) आवश्यक राहील.
विम्याचा लाभ घेताना लाभ घेणाऱ्या मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण असणे आवश्यक राहील. आणि तिने इयत्ता १० वी ची परिक्षा उत्तीर्ण (पास)होणे व १८ वर्ष पूर्ण होईपर्यंत अविवाहित असणे आवश्यक राहील.
दुस-या प्रसुतीच्या वेळेस जर जुळ्या (जुडवा) मुली झाल्या, तर त्या दोन्ही मुली प्रकार-२ प्रमाणे योजनेस पात्र असतील.
एखाद्या परिवाराने अनाथ मुलीस दत्तक घेतले असेल तर त्या मुलीला त्यांची प्रथम मुलगी मानून या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील. परंतु सदर लाभ प्राप्त होण्याकरीता दत्तक मुलीचे वय ० ते ६ वर्ष (६ किंवा ६ वर्षांपेक्षा कमी) इतके असावे.
बालगृहातील अनाथ मुलींसाठी ही योजना अनुज्ञेय राहील.
या मध्ये प्रकार-१ च्या लाभार्थी कुटुंबात एका मुलीनंतर व प्रकार-२ च्या लाभार्थी कुटुंबात दोन अपत्यांच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे बंधनकारक राहील.
सदर योजनेअंतर्गत १८ वर्षांनंतर एल.आय.सी. कडून जे रु.१,००,०००/- मिळणार आहेत त्यापैकी किमान रु.१०,०००/- मुलींच्या कौशल्य विकासावर खर्च करणे बंधनकारक राहील जेणेकरुन संबंधित मुलीला रोजगार मिळून कायमस्वरुपी उत्पन्न मिळेल.
‘माझी कन्या भाग्यश्री' या योजनेतील टप्पा-२ आणि टप्पा-३ व टप्पा-४मध्ये नमूद केलेले लाभ लाभार्थीस पोषण आहार तथा वस्तु स्वरुपात देय राहतील.
ज्या लाभधारकाचे खाते जनधन योजनेमध्ये असेल त्यांना जनधन योजनेअंतर्गत असणारे लाभ आपोआपच मिळू शकतील.
सदर योजना ही आधार सोबत जोडण्यात येईल.
विहित मुदतीपूर्वी (वयाची १८ वर्षे पूर्ण होण्यापूर्वी) मुलीचा विवाह अथवा मृत्यू झाल्यास, या योजनेचा फायदा तिच्या पालकांना होणार नसून, मुलीच्या नांवे बँक खात्यात जमा असणारी रक्कम महाराष्ट्र शासनाचे नांवे असणा-या Surplus अकाऊंट किंवा खात्यामध्ये जमा म्हणून दर्शविली जाईल.
भारतीय आयुर्विमा महामंडळ (एल.आय.सी) हे महाराष्ट्र शासनाच्या नांवे एक नवीन पॉलिसी काढतील, ज्यामध्ये प्रत्येक लाभार्थी मुलीकरीता स्वतंत्र खाते असून, Surplus खाते खालील परिस्थितीमध्ये कार्यरत करण्यात येईल.
जर वैयक्तिक मुलीच्या नांवे असलेल्या एकत्रित निधी (Corpus) रु.१ लाखापेक्षा अधिक झाल्यास, जादाची रक्कम या खात्यामध्ये जमा होईल.
मुदतीपूर्वी विवाह अथवा मृत्यू झाल्यास, मुलीच्या नावांवरील रक्कम एकत्रित निधी (Corpus) Surplus g|(RTICIV जमा होईल.
Corpus रु.१ लक्ष पेक्षा कमी असल्यास, उर्वरित रक्कम Surplus खात्यामधुन जमा केली जाईल.
‘माझी कन्या भाग्यश्री' योजनेच्या स्वरुपामध्ये परिच्छेद २ मध्ये नमूद टप्प्यातील लाभ जर लाभार्थयास इतर विभागाच्या योजनेतुन मिळत असतील तर या योजनेचे लाभ अनुज्ञेय राहणार नाहीत.
“माझी कन्या भाग्यश्री” या योजनेअंतर्गत परिच्छेद क्रमांक २ मधील टप्पा-१ मधील जन्मदिन साजरा करण्याकरीता लाभार्थी कुटुंबास रोख स्वरुपात देण्यात येतील. आणि उर्वरीत टप्प्यातील नमूद लाभ पोषण आहार तथा वस्तूच्या स्वरुपात देण्यात येईल.
“माझी कन्या भाग्यश्री” या योजनेकरिता सरकारी यंत्रणेचे कामकाज कसे असते ? ते पाहुया.(How does the government work for the "My Daughter Bhagyashree" scheme?)
“माझी कन्या भाग्यश्री” या योजनेअंतर्गत लाभाकरिता मुलीच्या पालकांनी मुलीचा जन्म झाल्यावर संबंधित ग्रामपंचायत/नगरपालिका/महानगरपालिका या ठिकाणी मुलीच्या नांवाची नोंदणी केल्यानंतर त्या क्षेत्रातील अंगणवाडी सेविकेकडे प्रपत्र-‘अ’ किंवा ‘ब’ मध्ये अर्ज सादर करावा. अर्जासोबत वडील राज्याचे मूळ रहिवाशी असल्याचा पुरावा, (अधिवास प्रमाणपत्र) Domecile Certificate आणि जन्म नोंदणी प्रमाणपत्र, दारिद्रय रेषेखालील असल्याचा पुरावा (रेशन कार्ड / उत्पत्राचा दाखला), लाभार्थी कुटुंबाने प्रकार-१ चा लाभ घ्यायचा असल्यास पहिल्या अपत्याच्या (मुलगी) जन्मल्यानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली असल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करावे. तसेच दुसरे अपत्य असलेल्या मुलीसाठी अर्ज करतांना कुटुंबनियोजन शस्त्रकिया केली असल्याबाबतचे वैदयकीय अधिकारी यांचे प्रमाणपत्र, ही कागदपत्रे सादर करावीत. “माझी कन्या भाग्यश्री” योजनेकरीता आवश्यक असलेले सर्व अर्ज राज्यातील प्रत्येक ग्रामीण व नागरी बाल विकास प्रकल्प अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बाल कल्याण), जिल्हा परिषद, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, विभागीय उपायुक्त (महिला बाल विकास) यांचे कार्यालयामध्ये विनामूल्य उपलब्ध असतील. प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी अंगणवाडी सेविकेने करावी व प्राप्त झालेला अर्ज अंगणवाडी सेविकेने पर्यवेक्षिका/मुख्यसेविकेकडे सादर करावा.
अंगणवाडी पर्यवेक्षिका/मुख्यसेविका सदर अर्जाची व प्रमाणात्रांची तपासणी करुन प्रत्येक महिन्याला नागरी प्रकल्पाबाबत बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना व ग्रामीण प्रकल्पा बाबत ग्रामीण बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या मार्फत उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बाल कल्याण), जिल्हा परिषद, यांना एकत्रित यादी मान्यतेसाठी सादर करण्यात यावी.
संबंधित असणारे बाल विकास प्रकल्प अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बाल कल्याण) हे ऐच्छिकरित्या जिथे जास्त संख्या असलेल्या एखाद्या वस्तीची तपासणी करतील व त्यांची खात्री झाल्यानंतर लाभार्थी यादीला मान्यता देतील. त्यानंतर एक महिन्याच्या कालावधीमध्ये पडताळणी करुन बाल विकास प्रकल्प अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बाल कल्याण) हे रुपये २१,२००/- एवढी रक्कम LIC कडे जमा करतील व इतर अनुज्ञेय रक्कम चेकद्वारे संबंधित मुलीच्या आईच्या नावे अदा करतील.
यामध्ये मुलीचा जन्म झाल्यानंतर तिचे नांव नोंदविल्यावर त्या क्षेत्रातील किंवा भागातील अंगणवाडी सेविका/मुख्य सेविका/बाल विकास प्रकल्प अधिकारी महिला व बाल विकास विभागांतर्गत संस्थांच्या बाबतीत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांचेकडे अर्ज करता येईल. “माझी कन्या भाग्यश्री” या योजनेकरिता आवश्यक असलेले सर्व अर्ज राज्यामधील प्रत्येक ग्रामीण व नागरी बाल विकास प्रकल्प अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बाल कल्याण), जिल्हा परिषद, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, विभागीय उपायुक्त (महिला बाल विकास) यांचे कार्यालयामध्ये विनामूल्य उपलब्ध करून देण्यात यावेत. अर्जदारांनी संपूर्ण तपशीलासह भरून दिलेले अर्ज कागदपत्रासह वर नमूद केलेल्या संबंधित अधिकार्यांनी मुलीच्या जन्माच्या एका वर्षांच्या विहित मुदतीपर्यंत स्वीकारावेत. दत्तक मुलींच्या बाबतीत ६ वर्षांपर्यंतच्या विहित मुदतीमध्ये स्वीकारण्यात यावे. लाभार्थीचा अर्ज जर संपूर्ण भरलेला नसल्यास अथवा सर्व प्रमाणपत्रासह नसल्यास (अपूर्ण असल्यास) अर्ज मिळाल्यापासून १५ दिवसाच्या आतमध्ये अर्जदारास कळवावे. अर्जदारांनी जर अपूर्ण भरलेले अर्ज किंवा आवश्यक ती कागदपत्रे जोडलेली नसल्यास अशा अर्जदारांना वरील मुदती व्यतिरिक्त वाढीव एक महिन्याची मुदत देण्यात येईल. परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये प्राप्त झालेला कोणताही अर्ज दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ प्रलंबित ठेवता येणार नाही.
या योजने नुसार मुलीला एल.आय.सी. योजनेचे लाभ देण्याकरिता संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बाल कल्याण विभाग) यांच्या मान्यतेनंतर जर मुलीचे पालक जनधन योजनेअंतर्गत बॅक बचत खाते उघडतील आणि त्याबाबतचा तपशिल (माहिती) संबंधित बाल विकास प्रकल्प कार्यालयास कळवतील. सदर अर्ज प्राप्त झाल्यावर ३० दिवसांच्या आत/अपवादात्मक परिस्थितीमध्ये ६० दिवसांच्या आत पडताळणी करुन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी/बाल विकास प्रकल्प अधिकारी/उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बाल कल्याण) हे संबंधित विभागातील आयुर्विमा महामंडळाच्या कार्यालयाशी (P&GS Unit) प्रपत्र - 'क' येथील विहित नमुन्यात माहिती भरून संपर्क साधतील.वरील नियम शासनाने ठरवुन दिले आहे.
“माझी कन्या भाग्यश्री” या योजने करिता आवश्यक लागणारी कागदपत्रे (पात्रता) पाहुया.(Documents required for "My Daughter Bhagyashree" scheme)
अर्जदारांचे आधार कार्ड (Aadhar card of the applicant)
उत्पन्न प्रमाणपत्र (Certificate of Income)
पत्त्याचा पुरावा (Proof of address)
मोबाईल नंबर (Mobile number)
पासपोर्ट आकाराचे फोटो (Passport size photos)
आईचे किंवा मुलीचे बँक खाते पासबुक (Mother or daughter's bank account passbook)
अर्जदार हा महाराष्ट्राचा कायमचा रहिवासी असावा (The applicant should be a permanent resident of Maharashtra)
कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र (Certificate of family planning surgery)
सावित्रीबाई फुले योजनेचा लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र (Certificate of non-benefit of Savitribai Phule scheme)
राशन कार्ड (Ration card)
सुधारित माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ कशा घ्यावा हे पाहुया. (Let's see how to take advantage of the modified My Daughter Bhagyashree scheme)
सदर योजनेंतर्गत, लाभासाठी मुलीच्या पालकांनी, मुलीचा जन्म झाल्यावर संबंधित ग्रामीण व नागरी क्षेत्रातील संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मुलीच्या जन्माची नोंदणी केल्यानंतर, त्या क्षेत्रातील अंगणवाडी सेविकाकडे प्रपत्र–अ. किंवा -ब. मध्ये (जे लागू असेल ते) अर्ज सादर करावा.आणि अर्जासोबत उपरोक्त अटी व शर्ती नुसार नमूद दस्तऐवज (कागद पत्र) सादर करण्यात यावेत. “माझी कन्या भाग्यश्री” या योजनेकरिता आवश्यक असणारे सर्व अर्ज राज्यातील प्रत्येक ग्रामीण व नागरी बाल विकास प्रकल्प अधिकारी, महिला व बाल विकास अधिकारी आणि जिल्हा परिषद, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, विभागीय उपायुक्त (महिला बाल विकास) यांचे कार्यालयात विनामूल्य उपलब्ध असतील.अंगणवाडी सेविकेने संबंधीत लाभार्थ्या कडून अर्ज भरून घ्यावा (गरजेप्रमाणे लाभार्थ्यांचा अर्ज भरण्यास मदत करावी)सदर अर्ज अंगणवाडी पर्यवेक्षिका / मुख्यसेविका यांच्याकडे सादर करावा. अंगणवाडी पर्यवेक्षिका / मुख्य सेविका यांनी, सदर अर्जाची व प्रमाण पत्राची छाननी / तपासणी करून प्रत्येक महिन्याला नागरी व ग्रामीण क्षेत्रातील बाल विकास प्रकल्प अधिकारी तसेच संस्थामधील अनाथ बालकांच्या बाबतीत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी महिला व बाल विकास अधिकारी, जिल्हा परिषद, यांना एकत्रित यादी मान्यतेसाठी सादर करावी. महिला व बाल विकास अधिकारी आणि जिल्हा परिषद यांनी सदर यादीची योग्य ती छाननी करुन त्या यादीस मान्यता देऊन ती बँकेस सादर करावी. बाल गृह/शिशु गृह किंवा महिला व बाल विकास विभाग तर्गत च्या इतर निवासी संस्था मधील अनाथ मुलींबाबत लाभ मिळण्यासाठी अर्ज सादर करण्याआधी संबंधित बाल कल्याण समिती यांचे मुलगी अनाथ असल्याचे प्रमाणपत्र संबंधित संस्थानी प्राप्त करून घेऊन अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
माझी कन्या भाग्यश्री योजने मध्ये 50 हजार रुपये मिळण्याकरीता नियम कोण-कोणते आहेत ?(What are the rules for getting Rs 50,000 in my Kanya Bhagyashree scheme?)
मित्रांनो Majhi Bhagyashree Kanya Yojana माझी कन्या भाग्यश्री योजना याचे शुभारंभ महाराष्ट्र सरकारने 1 एप्रिल 2016 मध्ये केले होते. ही योजना मुलींचे प्रमाण सुधारण्यासाठी आणि स्त्री शिक्षणाला चालना देण्यासाठी हे केले गेले. या योजनेंतर्गत राज्यातील जे पालक मुलीच्या जन्मानंतर 1 वर्षाच्या आत नसबंदी करून घेतील, त्या मुलीच्या नावावर शासनाकडून 50,000 रुपये जमा केले जातील. या योजनेंतर्गत दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर पालकांनी कुटुंब नियोजन दत्तक घेतले असेल, तर नसबंदीनंतर दोन्ही मुलींच्या नावावर 25000-25000 रुपये बँकेत जमा करण्यात येतील. असे वरील नियम आहेत.
माझी कन्या भाग्यश्री योजनेकरीता अर्ज कसा करावा किंवा अर्ज करण्याची पद्धत कशी आहे?(How to apply for my Kanya Bhagyashree Yojana or how to apply?)
राज्यातील जे इच्छुक लाभार्थी ज्यांना MKBY 2021 अंतर्गत अर्ज करावयाचा आहे. त्यांनी महाराष्ट्र सरकार विभागाच्या https://womenchild.maharashtra.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवर जाऊन वरून माझी कन्या भाग्यश्री योजनेचा अर्ज PDF Download डाउनलोड करावयाचा आहे. किंवा खाली दिलेल्या लिंक वरून आपण अर्ज pdf download करू शकता. अर्ज डाऊनलोड केल्यानंतर, तुम्हाला अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती भरावी लागेल जसे की नाव, पत्ता, पालकांचे नाव, मुलीच्या जन्माची तारीख, मोबाईल नंबर इ.सर्व माहिती भरल्यानंतर, तुम्हाला वर नमूद केलेली सर्व कागदपत्रे फॉर्म सोबत जोडावी लागतात.आणि तुमच्या जवळच्या जिल्हा परिषद येथील महिला व बालविकास कार्यालयात नेऊन जमा करावी.अशा प्रकारे तुमचा अर्ज माझी कन्या भाग्यश्री योजने मध्ये सादर केला जाईल.
माझी भाग्यश्री कन्या योजनेकरीता कोण-कोणती कागदपत्रे लागतात?
उत्तर :- माझी भाग्यश्री कन्या योजनेकरीता खालील दिलेले कागदपत्रे लागतात.
अर्जदारांचे आधार कार्ड (Aadhar card of the applicant)
उत्पन्न प्रमाणपत्र (Certificate of Income)
पत्त्याचा पुरावा (Proof of address)
मोबाईल नंबर (Mobile number)पासपोर्ट आकाराचे फोटो (Passport size photos)
आईचे किंवा मुलीचे बँक खाते पासबुक (Mother or daughter's bank account passbook)
अर्जदार हा महाराष्ट्राचा कायमचा रहिवासी असावा (The applicant should be a permanent resident of Maharashtra)
कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र (Certificate of family planning surgery)
सावित्रीबाई फुले योजनेचा लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र (Certificate of non-benefit of Savitribai Phule scheme)
राशन कार्ड (Ration card)
FAQ ?
माझी कन्या भाग्यश्री या योजनेचे फायदे कोण-कोणते आहे?
उत्तर:- या योजनेचा फायदा असा आहे की एका कुटुंबामधील दोन मुलींना याचा लाभ दिला जाईल.
म्हणजे दोन्ही मुलींच्या नावावर 25000-25000 रुपये बँकेत जमा करण्यात येतील.
माझी कन्या भाग्यश्री योजनेमधील रक्कम मुलगी किती वर्षाची झाल्यानंतर मिळते?
उत्तर:- मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर या योजनेतील रक्कम मिळते.
माझी कन्या भाग्यश्री योजना अंतर्गत किती रुपये मुलीला देण्यात येते?
उत्तर:- या योजनेअंतर्गत मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्या नंतर 1 लाख रुपये देण्यात येते.
या योजनेचा लाभ एका कुटुंबामधील किती जणांना किंवा मुलींना घेता येतो?
उत्तर:- या योजनेचा लाभ एका कुटुंबातील फक्त 2 मुलींना घेता येतो.
या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत कोणत्या प्रकारची आहे म्हणजे ऑनलाइन की ऑफलाइन ?
उत्तर:- या लाभ घेण्यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो.
या योजनेअंतर्गत पहिल्या मुलीचा लाभ घेण्यासाठी आई-वडिलांना किती वर्षाच्या आत कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया पार पाडने आवश्यक आहे.
उत्तर:- पहिल्या मुलीचा लाभ घेण्यासाठी आई-वडिलांना 1 वर्षाच्या आत कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया पार
पाडने आवश्यक आहे.
या योजनेअंतर्गत दुसऱ्या मुलीचा लाभ घेण्यासाठी आई-वडिलांना किती वर्षाच्या आत कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया पार पाडने आवश्यक आहे?
उत्तर:- दुसऱ्या मुलीचा लाभ घेण्याकरीता आई-वडिलांना 6 महिन्याच्या आत कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया
पार पाडने आवश्यक आहे.
सारांश (Summary):-
0 Comments