आजची पोलिस भरती सराव चाचणी पेपर क्र. ०७
मित्रांनो १०० गुणांचा सराव पेपर तुम्हाला खाली दिलेल्या तक्त्याप्रमाणे pdf स्वरूपामध्ये Download करता येईल.Police Bharti 100 Mark Online Free Test - 2022
अ.क्र. | प्रवर्ग | वय |
१ | खुला प्रवर्ग | १८ ते २८ वर्षा पर्यन्त |
२ | मागास प्रवर्ग | १८ ते ३३ वर्षा पर्यन्त |
३ | प्रकल्पग्रस्त उमेदवार | १८ ते ४५ वर्षा पर्यन्त |
४ | माजी सैनिक(Ex Man) | उमेदवाराच्या सशस्त्र दलामध्ये झालेल्या सेवा इतका कालावधी अधिक ३ वर्ष इतकी सूट राहील. |
५ | अनाथ उमेदवारांकरिता | १८ ते ३३ वर्षा पर्यन्त |
६ | भूकंपग्रस्त उमेदवार | १८ ते ४५ वर्षा पर्यन्त |
७ | खेळाडू उमेदवार | १८ ते ३८ वर्षे पर्यन्त |
८ | पोलीस पाल्य | १८ ते ३३ वर्षा पर्यन्त |
९ | गृह रक्षक (होमगार्ड) | १८ ते ३३ वर्षा पर्यन्त |
महाराष्ट्र पोलीस भरती २०२२ शारीरिक चाचणी (Maharashtra Police Bharti Physical Test Details)
मित्रांनो महाराष्ट्र शासनाकडून दिनांक २३ जुन २०२२ रोजी maharashtra police bharti पोलीस शिपाई पदाकरिता गृह विभागाकडून सेवा प्रवेश नियम (New GR) जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार maharashtra police bharti महाराष्ट्र पोलीस भरती मध्ये आता पहिले शारीरिक चाचणी Physical Test होणार आहे. शारीरिक चाचणी बद्दल सविस्तर माहिती आपण खालील प्रमाणे पाहु या. शारीरिक चाचणी मध्ये मित्रांनो पुरुष उमेदवारांकरिता १६०० मीटर धावणे, १०० मीटर धावणे, व गोळा फेक असे तीन इवेंट होणार आहे. आणि कोणत्या इवेंटला किती गुण आहे ते आपण खाली दिलेल्या चार्ट प्रमाणे पाहणार आहोत. शारीरिक चाचणी मध्ये मित्रांनो महिला उमेदवारांकरिता ८०० मिटर धावणे, १०० मीटर धावणे,आणि गोळा फेक (गोळ्याचे वजन ४ किलो) महिलांच्या शारीरिक चाचणी बद्दल सविस्तर माहिती आपण खाली दिलेल्या चार्ट प्रमाणे पाहणार आहोत.
अ.क्र. | पुरुष शारीरिक चाचणी इवेंट | इवेंट गुण | महिला शारीरिक चाचणी इवेंट | इवेंट गुण |
१ | १६०० मीटर धावणे | २० गुण | ८०० मिटर धावणे | २० गुण |
२ | १०० मीटर धावणे | १५ गुण | १०० मीटर धावणे | १५ गुण |
३ | गोळा फेक | १५ गुण | गोळा फेक | १५ गुण |
एकूण | ५० गुण | एकूण | ५० गुण |
मित्रांनो Maharashtra Police Recruitment 2022 महराष्ट्र पोलिस भरती मध्ये दोन चाचण्या घेण्यात येतात. १ शारीरिक चाचणी Physical Test आणि २ लेखी चाचणी written test शारीरिक चाचणी ची सविस्तर माहिती आपण वर पाहिली आहे. लेखी परीक्षे बद्दल सविस्तर माहिती पाहु या. लेखी परीक्षे मध्ये मित्रांनो सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, मराठी व्याकरण, गणित, बौद्धिक चाचणी या विषयावर एकुण १०० गुणांकरिता लेखी चाचणी घेण्यात येत असते. लेखी परीक्षा ही वस्तुनिष्ट स्वरूपाची असते. लेखी परीक्षेकरिता written test वेळ ९० मिनिटे म्हणजे दीड तास असते. उमेदवारांना लेखी परीक्षे मध्ये उत्तीर्ण होण्याकरिता ४० टक्के गुणांची आवश्यकता असते. मित्रांनो तुम्हाला जर मागील वर्षाच्या पोलिस भरतीच्या झालेल्या प्रश्न पत्रिका आणि उत्तर पत्रिका maharashtra police bharti question paper पहाव्याच्या असल्यास खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करुन तुम्ही मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका पाहु शकता.
मागच्या वर्षीच्या पोलिस भरतीच्या प्रश्नपत्रिका पाहण्याकरिता |
महाराष्ट्र पोलीस भरती २०२२ प्रशिक्षण कालावधी (Maharashtra Police Training Period)
मित्रांनो maharashtra police new recruitment महाराष्ट्र पोलिस शिपायांच्या प्रशिक्षण कालावधी हा एकुण ९ महीनांचा असतो. मित्रांनो प्रशिक्षण केंद्र जालना, मरोळ, भाबळगाव, खंडाळा,नागपूर, सोलापूर, अकोला, तासगाव, दोंड इत्यादि ठिकाणी आहे. प्रशिक्षण कालावधीमध्ये IPC, CRPC, MAHARASHTRA POLICE ACT आणि काही कायदे व पोलिसांचे अधिकार काय असतात. आणि पोलिसांची कर्तव्य, पोलिस स्टेशन भेटी , वेगवेगळे बंदोबस्त, ग्राउंड ची परीक्षा आणि लेखी परीक्षा होते. आणि ९ महीनांचा कालावधी झाल्यानंतर पोलिस शिपायची पासिंग आउट होते. सर्व पोलीस शिपायांना आपआपल्या जिल्ह्यामध्ये पाठवण्यात येते. इत्यादि प्रशिक्षण कालावधि मध्ये घेण्यात येते.
FAQ About Maha Police Bharti 2022 ?
1 महाराष्ट्र पोलीस भरती कधी निघणार आहे ?
उत्तर :- महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रिया चालू असून लवकरच भरती निघेल असे अपेक्षित आहे.
2 महाराष्ट्र पोलीस भरती मध्ये नवीन जी आर नुसार शारीरिक चाचणी किती गुणांची असणार आहे ?
उत्तर :- महाराष्ट्र पोलीस भरती मध्ये नवीन जी आर नुसार शारीरिक चाचणी हि ५० गुणांची असणार आहे.
3 महाराष्ट्र पोलीस भरती मध्ये नवीन जी आर नुसार लेखी परीक्षे मध्ये काही बदल करण्यात आला आहे का ?
उत्तर :- महाराष्ट्र पोलीस भरती मध्ये नवीन जी आर नुसार लेखी परीक्षे मध्ये काही बदल करण्यात आला नाही.
0 Comments