Arogya Vibhag Bharti New Update GR||आरोग्य विभागाची ग्रुप क आणि ड ची परीक्षा रद्द
नमस्कार मित्रांनो !
mpscstudymaterial.com मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे.आरोग्य विभाग भरती २०२१ परीक्षा रद्द
Arogya vibhag bharti 2021 cancelled:-
मित्रांनो आज झालेल्या मंत्री मंडळाच्या झालेल्या बैठकीमध्ये आरोग्य विभागातर्फे गट क आणि गट ड या संवर्गांसाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत २४ ऑक्टोबर आणि ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी घेण्यात आलेल्या गट क आणि गट ड संवर्गाच्या पदभरती परीक्षा प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. या बाबत निर्णय घेण्यात आला आहे. आता पुन्हा भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.ऑक्टोबर २०२१ मध्ये घेण्यात आलेलीआरोग्य विभागाच्या ग्रुप क आणि ग्रुप ड करिता ज्या उमेदवारांनी परीक्षा दिली आहे. त्या उमेदवारांनी पुन्हा घेण्यात येणाऱ्या परीक्षेमध्ये अर्ज करण्याची आवशक्यता नसल्याचेही या निर्णयांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. नव्याने अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना परीक्षा शुल्क आणि इतर नियम अटी लागू राहणार असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.
Arogya vibhag bharti 2021:-
मित्रांनो सार्वजनिक आरोग्य विभागाची पदभरती अंतर्गत 'गट क' या संवर्गाकरिता एकूण २७४० जागा आणि 'गट ड' संवर्गाकरिता एकुण ३५०० जागा विविध पदांसाठी २४ ऑक्टोबर आणि ३१ ऑक्टोबर २०२१ परीक्षा घेण्यात आली होती. यामध्ये मित्रांनो अंदाजे साडेनऊ लाखांहून अधिक उमेदवार सहभागी झाले होते.
मित्रांनो या प्रक्रिये मध्ये परीक्षेदरम्यान गैरप्रकार झाल्याची तक्रार MPSC समन्वय समितीने पुणे CYBER पोलिसांकडे दिली होती. त्यामध्ये पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले. तसेच या तपासादरम्यान TET परीक्षेमधील घोटाळा सुद्धा समोर आला. या दोन्ही परीक्षांमधील गैरप्रकारासंदर्भात उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच या संदर्भात पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ही आरोग्य विभागाची भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय शासनाकडुन घेण्यात आला.
0 Comments