New Labor Act passed by Govt

 New Labor Act passed by Govt||नवा कामगार कायदा सरकार कडून पारित कोणते आहेत नवीन महत्वपुर्ण सुधारित नियम !


    केंद्रीय कामगार मंत्रालयाकडुन कामगार नियमांमध्ये बदल करण्यात आले आहे. त्यामुळे आपल्या देशामधील कामगारांना या नवीन नियमाचा मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे. या नवीन नियमामध्ये प्रथमतः  ग्रॅच्युईटीवर भर देण्यात आला असून ह्या नविन कामगार कायद्याचा स्विकार जवळ-जवळ आपल्या देशामधील  सर्व राज्यांनी स्विकाराला असून या नवीन कामगार कायद्यामध्ये कोणत्या सुधारित तुरतुदी लागु करण्यात आल्या आहेत. या बद्दल संपूर्ण माहिती आपण खाली प्रमाणे पाहू या. 
  • या अगोदर किमान पाच वर्ष काम केल्यासच ग्रॅच्युईटीचा लाभ दिला जात होता. परंतु या नवीन सुधारित कामगार कायद्यामुळे कर्मचाऱ्यांनी एक वर्ष काम करताच त्यांना  गॅच्युईटीचा लाभ मिळणार आहे. 
  • तसेच या नवीन नियमामुळे  कर्मचाऱ्यांकडुन आठवड्याभरामध्ये  48 तासापेक्षा अधिक तास काम घेतले जाणार नाही. आणि आठवड्याभरातील  काम कर्मचारी चार दिवसांमध्ये देखिल पुर्ण करु शकणार आहेत.
  • या नवीन नियमामुळे कर्मचाऱ्यांनी 180 दिवस काम केल्यास सदर कर्मचाऱ्यांस दीर्घ सुट्टीचा लाभ अनुज्ञेय असणार आहे . (या अगोदर ही मर्यादा 240 दिवसांची होती.)
  • या नवीन नियमामुळे महिला कर्मचाऱ्यांच्या सहमती शिवाय त्यांना रात्रपाळीत काम  करण्यासाठी दबाव टाकता येणार नाही. 
  • या नवीन  नियमानुसार कर्मचाऱ्यांला  इन हॅन्ड पगारामध्ये कपात होणार आहे. 
  • या नवीन नियमानुसार  कर्मचाऱ्याचे पीएफ मधील योगदान वाढविल्यामुळे कर्मचाऱ्यास हातात कमी वेतन मिळणार आहे. 
  • या नवीन नियमांनुसार सदर कपात रक्कम कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यात जमा करण्यात येणार आहे.जेणेकरुन सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांस वाढीव पेन्शनचा लाभ मिळणार आहे.
  • आमच्या Whatsapp Group ला जॉईन होण्याकरिता खाली दिलेल्या बटन ला क्लिक करा. 

Post a Comment

0 Comments