Bombay High Court Recruitment for Sweeper|मुंबई उच्च न्यायालय येथे सफाई कामगाराकरिता भरती
उच्च न्यायालय मुंबई(High Court Bombay):-
उच्च न्यायालय मुंबई येथे न्यायालयाच्या मूळ शाखा येथे सफाई कामगार या पदांकरिता रिक्त असणाऱ्या पदांकरिता उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सफाई कामगार या पदाकरिता झालेली निवड यादी ही प्रसिद्धीच्या दिनांका पासून फक्त दोन वर्षांकरिता वैध राहील. सातव्या आयोगानुसार सफाई कामगार या पदाची वेतन मॅट्रिक्स एस वन मध्ये वेतन स्तर १५०००/- ते ४७,६००/- व इतर वेतन वेतन व भत्ते लागू असणार आहे.
सफाई कामगार पदासाठी असणारी आवश्यक पात्रता(Eligibility Required Eligibility for the post of Cleaner):-
जे उमेदवार सफाई कामगार या पदाकरिता अर्ज करतील त्यांची शैक्षणिक अहर्ता ही कमीत कमी सातवी इयत्ता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच सफाई कामगार या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवाराला शौचालय व स्नानगृह स्वच्छतेचा झाडू कामाचा तसेच कार्यालय परिसर स्वच्छतेचा कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. तसेच सफाई कामगार या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवाराला मराठी व हिंदी भाषा लिहिता वाचता व बोलता येणे गरजेचे आहे. व सफाई कामगार या पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता कमीत कमी २१ वर्षे वयोमर्यादा असणे आवश्यक आहे व जास्तीत जास्त वयोमर्यादा ही ३८ वर्ष असणे आवश्यक आहे. तसेच मागासवर्गीय उमेदवारांकरिता कमीत कमी वयोमर्यादा ही २१ वर्षे आहे आणि जास्तीत जास्त ही ४३ वर्ष आहे.
सफाई कामगारांच्या दोन जागांकरीता भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून त्यांचे नियुक्ती व अल्प सूची सर्व अधिकार प्रशासन उच्च न्यायालय मूळ शाखा मुंबई यांनी स्वतःकडे रोखून ठेवले आहे. सफाई कामगार या पदाकरिता अर्ज सादर करणाऱ्या उमेदवार नैतिक पतनाच्या गुणांसाठी ठरविण्यात आले नसावी किंवा कोणत्याही राज्यसेवा आयोगाने आयोजित केलेल्या परीक्षा उपस्थित राहण्यापासून कायमचे काढून टाकले नसावी किंवा अपात्र ठरवलेले नसावे.
सफाई कामगार पदासाठी असणारी निवड पद्धती(Selection Procedure for the post of Sweeper):-
सफाई कामगार या पदासाठी एकूण ५० गुणांकरिता मूल्यांकन पद्धतीद्वारे निवड प्रक्रिया पार पाडणार आहेत. यामध्ये प्रात्यक्षिक परीक्षेसाठी ३० गुण देण्यात येणार आहे. शारीरिक क्षमता चाचणी करिता एकूण १० गुण तर वैयक्तिक मुलाखतीकरिता तोंडी परीक्षा करिता १० गुण असे एकूण ५० गुणांकरिता मूल्यांकन परीक्षा घेण्यात येणार आहे.
सफाई कामगाराच्या जाहिरातीमध्ये नमूद पात्र उमेदवारांनी दिनांक २१.१०.२०२२ पर्यंत ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. पद भरती बाबत अधिक सविस्तर माहिती करिता खाली दिलीली जाहिरात तुम्ही पाहू शकता. आणि खाली दिलेल्या लिंक वरून आपण जाहिरात डाउनलोड सुद्धा करू शकता.
0 Comments