Har Ghar Tiranga Now Certificate Download

 'हर घर तिरंगा' या मोहिमेचे सर्टिफिकेट डाऊनलोड कसे करावे ?

har ghar tiranga abhiyan,har ghar tiranga certificate,har ghar tiranga certificate download, har ghar tiranga news,har ghar tiranga certificate kaise banaye




Har Ghar Tiranga Campaign 2022  :- 

    भारताच्या स्वतंत्र दिनाच्या 75 व्या दिनानिमित्त 'हर घर तिरंगा' या योजनेला दिनांक 02 ऑगस्ट 2022 पासुन सुरवात झाली आहे. या योजनेचा महत्वाचा उद्देश हा आहे की सर्व भारतीय लोकांनी त्यांच्या घरावर भारतीय राष्ट्रध्वज फडकावा असा असून  मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'हर घर तिरंगा' har ghar tiranga abhiyan या योजनेमध्ये सहभागी होण्याकरिता सर्व भारतीयांना आवाहन केले आहे. आपल्या देशामध्ये 'आजादी का अमृत महोत्सव' अंतर्गत सरकारच्या माध्यमातून वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. 'हर घर तिरंगा' हा उत्सव दिनांक 13 ऑगस्ट 2022 ते दिनांक 15 ऑगस्ट 2022  दरम्यान साजरा करण्यात येणार आहे. मा. गृह मंत्री अमित शाह यांनी भारतीयांमध्ये  देशभक्तीची भावना जागृत करण्याच्या उद्देशाने या मोहिमेची सुरवात केली आहे. आपल्या सोशल मिडियाच्या डीपी मध्ये सुद्धा तिरंग्याचे फोटो लावावे.  

Har Ghar Tiranga Campaign 2022 :- 

    'हर घर तिरंगा' ही मोहीम राबवित असतांना राष्ट्रध्वज संदर्भातील नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

  • राष्ट्रध्वज च्या 2002 च्या नियमांनुसार राष्ट्रध्वजाचा उपयोग व्यावसायिक उद्देशाकरीता करण्यात येऊ नये.  
  • राष्ट्रध्वज हा उलटा फडकवण्यात येऊ नये. 
  • राष्ट्रध्वज हा खाली म्हणजे जमीनीवर पडु देऊ नये. 
  • राष्ट्रध्वज हा फाटलेला किंवा मळालेला असु नये.  
  • राष्ट्रध्वजाचा अंगाभोवती गुंडाळण्या करीता वापर करू नये. 
  • राष्ट्रध्वज हा रूमलावर किंवा कपड्यावर छापु नये. 
  • राष्ट्रध्वजाचा उपयोग वाहन, रेल्वेगाडी च्या वरचा छत झाकण्याकरिता करण्यात येऊ नये. 
  • राष्ट्रध्वज हा दुसऱ्या झेंड्या सोबत म्हणजे त्याच्या बरोबर फडकवण्यात येऊ नये. 


Har Ghar Tiranga Campaign 2022  :- 'हर घर तिरंगा' या योजनेचे प्रमाणपत्र कसे डाऊनलोड करावे

  • har ghar tiranga certificate
  • सर्व प्रथम www.harghartiranga.com या संकेतस्थळाला भेट द्या. 
  • त्या नंतर PIN A FLAG या पर्यायवर क्लिक करा. 
  • त्या नंतर तिथे विचरण्यात आलेली तुमचे नाव टाका नंतर तुमचा मोबाइल क्रमांक किंवा तुमचा ई-मेल टाका. 
  • त्या नंतर तुमच्या लोकशनमध्ये  प्रवेश करण्याची परवानगी त्या संकेतस्थळाला द्या. 
  • त्या नंतर तुमचे फोटो त्या साईटवर अपलोड करा. 
  • त्या नंतर तुमचे प्रमाणपत्र उपलब्ध होईल ते डाऊनलोड करुन घ्या. 

ध्वज संहितेमध्ये तीन विभाग आहे. ते आपण खाली प्रमाणे पाहु या. 

  • पहिला विभाग राष्ट्रध्वजाचे विहंगालोकन देतो.
  • दुसरा विभाग सार्वजनिक, खासगी संस्था आणि इतर संस्थाच्या सदस्याद्वारे ध्वज प्रदर्शनावर चर्चा करतो. 
  • तिसरा विभाग संघराज्य आणि राज्ये सरकारे, तसेच त्यांच्या संस्था/एज्नीद्वारे राष्ट्रध्वज प्रदर्शित करण्याविषयी आहे.     

 FAQ

1. घरावर तिरंगा लावण्यासाठी परवानगी घ्यावी लागते का ?

उत्तर :- तुम्ही तुमच्या घरावर भारताचा राष्ट्रध्वज म्हणजे तिरंगा लावण्यासाठी कोणतीही परवानगी घ्यायची गरज नाही. पण तुम्हाला फ्लॅग कोड (ध्वज संहिता) मध्ये दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल. 

2. 'हर घर तिरंगा' हा उत्सव कधी साजरा  करण्यात येणार आहे ?

उत्तर :- 'हर घर तिरंगा' हा उत्सव दिनांक 13 ऑगस्ट 2022 ते दिनांक 15 ऑगस्ट 2022  दरम्यान साजरा करण्यात येणार आहे.

3. भारताचा कितवा स्वतंत्र दिवस साजरा करण्यात येणार आहे ?

उत्तर :- भारताचा 75 वा स्वतंत्र दिवस साजरा करण्यात येणार आहे. 


    


Post a Comment

0 Comments