Dearness Allowance DA Calculator|महागाई भत्ता ३१% वरून ३४% आपल्या पगारामध्ये किती झाली वाढ !
राज्यातील कर्मचाऱ्यांचा DA भत्ता 31 टक्के वरुन 34 टक्के
दि.16.08.2022 रोजी मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढीबाबत मोठा निर्णय घेण्यात आला असून त्यामध्ये २०२२ च्या जानेवारी महिन्यापासून 3 टक्के वाढीव महागाई (D.A.) भत्ता जाहीर करण्यात आला आहे. (D.A.) च्या फरकाची रक्कम ऑगस्ट महिन्याच्या वेतन / निवृत्तीवेतन देयकासोबत रोखीने देण्यात येणार आहे.
राज्यातील कर्मचाऱ्यांचा 3% DA भत्ता
राज्यामधील सरकारी कर्मचारी यांचा ०३% महागाई भत्ता वाढला आहे. तर सरकारी कर्मचारी यांच्या पगारामध्ये किती वाढ झाली. हे खाली दिलेल्या Calculator मध्ये पाहता येइल.
तसेच सरकारी कर्मचारी यांना दिनांक ०१ जानेवारी २०२२ ते ३१ जुले २०२२ पर्यंत सात महिन्याचे महागाई भत्याची थकबाकी रक्कम मिळणार आहे. वर सात महिन्याची थकबाकी काढण्याकरिता पुढील सूत्राचा वापर करावा.
मूल वेतन x 3/100 = (एका महिन्याची थकबाकी) x 7
आपल्या पगारामधील झालेली ३ % वाढ आपल्याला खाली प्रमाणे पाहता येईल.
- सर्वप्रथम खाली दिलेल्या बटन वर क्लिक करा.
- त्या नंतर आपल्यासमोरील मूळ वेतन (Basic Pay) या रकान्यात आपले मूळ वेतन टाका.
- त्या नंतर महागाई भत्ता (DA) या रकान्यात ३४% हा अगोदरच असेल.
- त्या नंतर आपल्या जिल्हयाला लागू असलेला घरभाडे (HRA) भत्ता या रकान्यात (९, १८, २७) यापैकी आपल्याला लागू असलेला HRA चा पर्याय निवडा.
- त्यानंतरआपल्याला देय असलेला प्रवास भत्ता (TA) टाका.
- त्या नंतर NPS १४% मध्ये तुम्हाला जर NPS लागू असेल तर होय असे निवडा आणि NPS नसून GPF लागू असल्यास नाही असे निवडा.
- त्या नंतर त्याखाली आपल्या डाव्या हातावर दिलेल्या Go ➡ या बटनावर क्लिक करा.
- आपल्यासमोर टेबलामध्ये ३१% महागाई भत्त्यानुसारचे वेतन व नंतर ३४% महागाई भत्त्यानुसार झालेली वाढ व पगारात झालेली वाढ तिथे तुम्हाला दिसेल.
महाराष्ट्र शासनाचे शासन निर्णय खाली दिले आहे. ते आपन पाहू शकता.
FAQ
1. राज्यातील सरकारी कर्मचारी यांच्या पगारीमध्ये महागाई भत्ता हा किती टक्क्यानी वाढविला आहे ?
उत्तर :- राज्यातील सरकारी कर्मचारी यांच्या पगारीमध्ये महागाई भत्ता हा तीन टक्क्यानी वाढविला आहे ?
2. राज्यामधिल सरकारी कर्मचाऱ्यांना वाढविण्यात आलेला महागाई भत्ता हा कोणत्या महिन्यापासून मिळणार आहे ?
उत्तर :- राज्यामधिल सरकारी कर्मचाऱ्यांना वाढविण्यात आलेला महागाई भत्ता हा जानेवारी २०२२ महिन्यापासून मिळणार आहे.
3. राज्यामधिल सरकारी कर्मचाऱ्यांना वाढविण्यात आलेला महागाई भत्ता हा कोणत्या महिन्याच्या वेतनामध्ये मिळणार आहे ?
उत्तर :- राज्यामधिल सरकारी कर्मचाऱ्यांना वाढविण्यात आलेला महागाई भत्ता हा माहे ऑगस्टच्या वेतनामध्ये मिळणार आहे.
0 Comments