शरद पवार ग्रामसमृद्धी योजना 2022
मित्रांनो महाराष्ट्र राज्य सरकारचा योजना आणण्याचा उद्देश हा असतो की राज्यामधील गोरगरीब व गरजू जनता आहे. त्यांना सर्व योजनेचा फायदा व्हावा मित्रांनो आज आपण सर्व योजनेमधुन एक असलेली “शरद पवार ग्रामसमृद्धी योजना” या बद्दल माहिती जाणून घेऊया.
“शरद पवार ग्रामसमृद्धी योजना” चे उद्धिष्ट:-
मित्रांनो आपण “शरद पवार ग्रामसमृद्धी योजना” ची उद्धिष्ट पाहुया. मित्रांनो महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा मूळ उद्धिष्ट हा ग्रामीण भागामधील व्यक्तींनी (कुशल व अकुशल) कामाची मागणी केल्यावर त्यांना कामे उपलब्ध करुन देणे व त्याद्वारे कायमस्वरूपी उपजीविका निर्माण करणे हे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना या योजनेचे मूळ उद्धिष्ट आहे. मित्रांनो राज्य सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यअंतर्गत अजून काही योजनांच्या संयोजनामधुन “शरद पवार ग्रामसमृद्धी योजना” राबवण्यासाठी राज्य सरकारने मान्यता दिली आहे.
“शरद पवार ग्रामसमृद्धी योजना” योजनेअंतर्गत चार वेगवेगळ्या कामांकरिता शेतकरी/गरीब ज्यांना गरज आहे. अश्या गरजू लोकांना अनुदान व बेरोजगार व्यक्तींनी (कुशल व अकुशल) कामाची मागणी केल्यावर त्यांना कामे उपलब्ध करुन देणे.
“शरद पवार ग्रामसमृद्धी योजना” अंतर्गत खालील दिल्या प्रमाणे त्या कामांकरिता अनुदान देण्यात येईल.
“शरद पवार ग्रामसमृद्धी योजना” कुकुट पालनासाठी शेड बांधणे.
कुक्कुट पालन करिता शेड बांधल्यास ग्रामीण भागामधील कुटुंबांना पूरक उत्पादना सोबतच आवशक्य असलेल्या पोषक प्राणिजन्य प्रथिनांचा पुरवठा होतो.
खेड्यांत कुक्कुट पक्षांना चांगल्या प्रतीचा निवारा उपलब्ध नसल्यामुळे त्यांचे आरोग्य नेहमीच खराब झालेले असते.कुक्कुट पालन करिता शेड बांधल्यास त्यांचे आरोग्य चांगले होण्यास मदत होईल.
कुक्कुट पक्ष्यांचे ऊन, पाऊस, वारंवार येणाऱ्या आजारांपासून संरक्षण करण्याकरिता चांगल्या प्रतीचा निवारा उपलब्ध करून देणे. हे कुक्कुट पालन करिता शेड बांधणे यामध्ये येते.
कुक्कुट पालन करिता शेड बांधल्यास चांगल्या निवाड्यामुळे रात्रीच्या वेळी त्यांचे पिल्लांचे व अंड्यांचे परभक्षी प्राण्यांपासून रक्षण होईल.
“शरद पवार ग्रामसमृद्धी योजना” यामध्ये असे स्पष्ट करण्यात येते की, ज्या शेतकऱ्यांना/ शेतमजुरांना कुकुट पालन करायचे आहे.. परंतु त्यांच्याकडे १०० पेक्षा अधिक पक्षी नाहीत अशा लाभार्थ्यांनी शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर (बॉन्डवर) दोन जामीनदार सह कुक्कुट पालन करिता शेड ची मागणी करावी.
आणि त्यानुसार संबंधित यंत्रणेने संबंधित लाभार्थ्याचे शेड बांधून द्यावे. व शेडचे काम पूर्ण झाल्यानंतर एक महिन्याच्या आतमध्ये कुक्कुटपालन शेडाचा आतमध्ये १०० पक्षी पाळण्यासाठी आणणे बंधनकारक राहील.
“शरद पवार ग्रामसमृद्धी योजना” अंतर्गत कुक्कुटपालन शेड बांधण्याकरिता जे अनुदान मिळेल त्याचा खर्च खालील प्रमाणे असेल.
अकुशल कामगारांकरिता अनुदान ४७६०/- रुपये (१०% प्रमाणे)
कुशल कामगारांकरिता अनुदान ४५,०००/- रुपये (९०% प्रमाणे)
दोन्ही मिळून एकूण खर्च ४९,७६०/- रुपये (१०० % प्रमाणे)
“शरद पवार ग्रामसमृद्धी योजना” अंतर्गत “भू” संजीवनी नाडेप कंपोस्टिंग योजना
“भू” संजीवनी नाडेप कंपोस्टिंग द्वारे कचऱ्यावर प्रक्रिया केल्यास त्यातील सेंद्रिय पदार्थ जैविक पद्धतीने सूक्ष्मजीव तसेच गांडूळ द्वारे कुजून त्यापासून उत्तम प्रकारचे सेंद्रिय कंपोस्ट खत तयार होते.
“भू” संजीवनी नाडेप कंपोस्टिंग द्वारे खत तयार झाल्यानंतर त्या खताचा वापर करून शेतात मोठ्या प्रमाणावर सुधारणा होऊन कृषी उत्पादनात मोठी भर पडू शकते.
अशा सेंद्रिय पदार्थामध्ये सर्व प्रकारचे सूक्ष्मजीव मोठ्या प्रमाणावर असतात. या सूक्ष्म जीवांची संख्या वाढते आणि हे मोठ्या संख्येने सगळ्यामध्ये सूक्ष्मजीव सेंद्रिय पदार्थाचे विघटन झपाट्याने करत असतात.
शेतातून निघालेल्या सर्व वनस्पतीजन्य पदार्थांचा पासून सेंद्रिय खत तयार करून परत शेतामध्ये टाकणे ही काळाची गरज बनली आहे
सेंद्रिय खतांमुळे जमिनीचा कस व जलधारण शक्ती वाढून त्यामध्ये पोषक द्रव्यांचा पुरवठा योग्य प्रमाणात होतो. आणि जमीन भुसभुशीत राहून जमिनीमध्ये हवा खेळती राहते शेतामध्ये उपयुक्त सूक्ष्मजीवांची वाढ होण्यास मदत होते.
“शरद पवार ग्रामसमृद्धी योजना” अंतर्गत “भू” संजीवनी नाडेप कंपोस्टिंग बांधण्याकरिता जे अनुदान मिळणार आहे. त्याचा खर्च खाली दिला आहे.
अकुशल कामगारांकरिता अनुदान ४०४६/- रुपये (३८% प्रमाणे)
कुशल कामगारांकरिता अनुदान ६४९१/- रुपये (६२ % प्रमाणे)
दोन्ही मिळून एकूण खर्च १०५३७/- रुपये (१०० % प्रमाणे)
“शरद पवार ग्रामसमृद्धी योजना” अंतर्गत गाय व म्हैस यांच्यासाठी पक्का गोठा बांधणे
“शरद पवार ग्रामसमृद्धी योजना” अंतर्गत गाय व म्हैस यांच्याकरिता पक्का गोठा बांधणे कारण सध्या ग्रामीण भागांत जनावरांच्या गोठ्याची जागा ही सर्वसाधारणपणे ओबडधोबड व खाचखळग्यांनी भरलेली असते. ग्रामीण भागामधील गोठे हे क्वचितच व्यवस्थितरीत्या बांधलेले असतात. गोठ्यात मोठ्याप्रमाणावर जनावरांचे मलमूत्र पडलेले असते. तसेच पावसाळ्याच्या दिवसामध्ये गोठ्यामधील जमिनीला दलदलीचे स्वरूप प्राप्त झालेले असते.
“शरद पवार ग्रामसमृद्धी योजना” अंतर्गत गाय व म्हैस यांच्याकरिता पक्का गोठा बांधावे कारण गोठ्यामधील ओबडधोबड व खाचखळग्यांनी भरलेली जमिनीमुळे जनावरांपासून मिळणारे मौल्यवान मलमूत्र यांचा संचय करता न आल्यामुळे ते मोठ्या प्रमाणावर वाया जाते.
“शरद पवार ग्रामसमृद्धी योजना” अंतर्गत गाय व म्हैस यांच्याकरिता पक्का गोठा बांधावे कारण जनावरांपासून मिळणारे मौल्यवान मलमूत्र हे एक उत्कृष्ट प्रकारचे सेंद्रिय खत आहे. त्यामुळे जनावरांच्या गोठ्यामधील जागा ही सिमेंट कॉंक्रीटचा वापर करून पक्के स्वरूपात सपाटीकरण केल्यास जनावरांपासून मिळणाऱ्या मलमूत्र गोठ्या शेजारील खड्ड्यांमध्ये एकत्र जमा करून त्याचा शेत जमिनीची सुपीकता व उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी उपयोग करून घेता येऊ शकतो.
ग्रामीण भागामध्ये या कारणामुळे महाराष्ट्र शासन sharad pawar samriddhi yojana in marathi “शरद पवार ग्रामसमृद्धी योजना” अंतर्गत गाय व म्हैस यांच्याकरिता पक्का गोठा बांधण्या करिता अनुदान देत आहे.
“शरद पवार ग्रामसमृद्धी योजना” अंतर्गत गाय व म्हैस यांच्याकरिता पक्का गोठा बांधण्याकरिता दोन गुरे ते सहा गुरांकारिता करिता एक गोठा आणि अधिकच्या गुरांकरिता सहाच्या पट्टीत म्हणजेच 12 गुरांसाठी दुप्पट व 18 पेक्षा जास्त गुरांकरिता तीन पट अनुदान देय राहील परंतु तीन पट्टी पेक्षा जास्त अनुदान अनुज्ञेय राहणार नाही.
दोन गुरे ते सहा गुरांसाठी एक गोठा साठी अनुदान
12 गुरांकरिता दुप्पट अनुदान
18 पेक्षा जास्त गुरांकरिता तीन पट अनुदान
तसेच हे पक्का गोठा बांधण्याकरिता जे अनुदान मिळणार असेल त्याचा खर्च खालीलप्रमाणे असणार आहे.
अकुशल कामगारांकरिता अनुदान ६१८८/- रुपये (०८% प्रमाणे)
कुशल कामगारांना अनुदान ७१,०००/- रुपये (९२ % प्रमाणे)
दोन्ही मिळून एकूण खर्च ७७,१८८/- रुपये (१०० % प्रमाणे)
“शरद पवार ग्रामसमृद्धी योजना” अंतर्गत शेळी पालनकरिता शेड बांधणे
सध्या शेळीपालन हा ग्रामीण भागातील अल्प उत्पन्न गटामधील कुटुंबांच्या उपजीविकेचे महत्त्वाचे साधन आहे.
अल्प उत्पन्न असलेल्या ग्रामीण भागामधील कुटुंबांच्या उत्पादनात वाढ होण्याकरिता शेळीपालन या व्यवसायाकरिता मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
जगामध्ये शेळी-मेंढीपालनावर उदरनिर्वाह करणारी गोर गरीब कुटुंबे पैश्याच्या अभावी शेळ्या-मेंढ्यांना चांगल्या प्रकारच्या संरक्षित निवारा देऊ शकत नाहीत.
चांगल्या निवार्या अभावी शेळ्या मेंढ्यांमध्ये विविध प्रकारचे जंत संसर्गजन्य कीटकांचा प्रादुर्भाव, निरनिराळे आजार होत असतात. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये रोगग्रस्त, खुरटी व आर्थिक दृष्ट्या फारशी किफायतशीर नसलेल्या शेळ्या-मेंढ्यांचे कळप पाळले जातात.
याकरिता मागणी केलेल्या प्रत्येक कुटुंबास sharad pawar samriddhi yojana in marathi “शरद पवार ग्रामसमृद्धी योजना” अंतर्गत शेळीपालन शेड बांधणे हे काम उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
ग्रामीण भागात शेळ्या मेंढ्या पासून मिळणारे शेण व मूत्र या पासून तयार होणाऱ्या उत्कृष्ट दर्जाच्या सेंद्रिय खते हि पक्क्या स्वरूपाचे व चांगले गोटे नसल्याने ते वाया जाते.
शेळ्या मेंढ्यासाठी चांगल्या प्रतीचे शेड बांधून दिल्यास त्यांचे आरोग्य देखील चांगले राहून वाया जाणारे मलमूत्र एकत्र करून शेतीमध्ये उत्कृष्ट प्रकारचे सेंद्रिय खत म्हणून वापर करता येते..
आणि त्यामुळे शेतीच्या सुपीकते बरोबरच शेती उत्पादन वाढीवर चांगला परिणाम होऊन उदर निर्वाहा करिता मदत होऊ शकेल.
“शरद पवार ग्रामसमृद्धी योजना” योजनेअंतर्गत शेळी पालानाकरिता ७.५० चौरस मीटर निवारा तसेच त्याची लांबी ३.७५ मीटर आणि रुंदी २ मीटर असणे आवश्यक आहे. चारही भिंतींची सरासरी उंची ही 2.2 मीटर असावी अशाप्रकारे शेड बांधून मिळेल. तसेच लोखंडी पत्रे सिमेंटचे पत्रे वापरावेत तळाकरिता मुरूम घालावा शेळ्यांना पिण्याच्या पाण्याची टाकी बांधावी.
या योजनेअंतर्गत किमान दोनशे भूमिहीन मजुरांना तसेच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकेल.
प्रत्येक दहा शेळ्यांकरिता एक गट ( एक शेड ) समजण्यात येईल व त्याप्रमाणे अनुदान करण्यात देण्यात येईल.
ज्याकडे दहापेक्षा अधिक शेळ्या असतील त्यांना शेळ्यांसाठी चे दोन गट लक्षात घेऊन दोन पट अनुदान राहील. तसेच एका कुटुंबामध्ये जास्तीत जास्त 30 शेळ्या करिता या योजने अंतर्गत अनुदान देण्यात येईल.
तसेच या योजने अंतर्गत शेळीपालन शेड बांधण्याकरिता जे अनुदान मिळणार असेल त्याचा खर्च खालील प्रमाणे असेल.
अकुशल कामगारांकरिता अनुदान ४२८४/- रुपये (०८% प्रमाणे)
कुशल कामगारांकरिता अनुदान ४५,०००/- रुपये (९२% प्रमाणे)
दोन्ही मिळून एकूण खर्च ४९,२८४/- रुपये (१०० % प्रमाणे)
शरद पवार ग्राम समृद्धी योजना पात्रता आणि कागदपत्र (Sharad Pawar Gram Samridhi Yojana Eligibility & Document)
“शरद पवार ग्रामीण समृद्धि योजने” चा लाभ घ्यायचा असेल तर खालील पात्रता आणि कागदपत्रे असणे अनिवार्य आहे.
“शरद पवार ग्रामीण समृद्धी योजना” पात्रता:-
अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवाशी असणे आवश्यक आहे.
शरद पवार ग्रामीण योजनेचा लाभ फक्त ग्रामीण भागांमधील लोकाना दिल जाईल.
या योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्जदार हा शेतकरी असणे आवश्यक आहे..
“शरद पवार ग्रामीण समृद्धी योजना” कागदपत्रे :-
अर्जदार हा महाराष्ट्रचा कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे.(The applicant must be a permanent resident of Maharashtra.)
अर्जदार यांचे आधार कार्ड.(Aadhar card of the applicant.)
अर्जदार यांचे रेशन कार्ड. (Ration card of the applicant.)
अर्जदार यांचा रहिवासी दाखला (Residence certificate of the applicant)
अर्जदार यांचा पासपोर्ट आकाराचा फोटो.(Passport size photo of the applicant.)/अर्जदार उत्पन्नाचा दाखला. (Proof of income of the applicant.)
शरद पवार ग्रामीण समृद्धी योजनेचा अर्ज आपण खाली पाहु शकता.आणि तो pdf मध्ये Download सुद्धा करू शकता.
👇👇👇
शरद पवार ग्रामीण समृद्धी योजनेचा अर्ज pdf Download
FAQ ? वारंवार विचारले जाणारे प्रश्न ?
- शरद पवार ग्रामसमृद्धि योजना काय आहे ?
सारांश (Summary)
आम्ही व आमची टीम असे गृहीत धरतो की आपल्याला “शरद पवार ग्रामसमृद्धी योजना 2022” बद्दल सर्व माहिती प्राप्त झाली आहे. आणि ती आपणास सोप्या पद्धतीने समजली आहे. तरी सुद्धा आपल्याला “शरद पवार ग्रामसमृद्धी योजना 2022” बाबत काही प्रश्न उदभवल्यास आम्हाला आमच्या ई-मेल आयडी www.mpscstudymaterial99@gmail.com किंवा कंमेंट्स च्या माध्यमातून आम्हाला आवश्य कळवा.आम्ही आपल्या प्रश्नाला तात्काळ उत्तर देण्याचा प्रयत्न करू व जर आपल्याला वरील “शरद पवार ग्रामसमृद्धी योजना 2022” बद्दल माहिती उपयुक्त वाटली असेल तर ज्याना या योजनेची आवशक्ता आहे. आणि आपले जे मित्र स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. त्यांना सुद्धा आवश्य शेअर करा. त्यांना या योजनेचा परीक्षेमध्ये मदत होईल.
0 Comments