MPSC Rajyaseva Mains Exam New Syllabus||राज्यसेवा मुख्य परीक्षा अभ्यासक्रम
MPSC Rajyaseva Mains Exam Major changes in a study order:-
नमस्कार मित्रांनो!
www. mpscstudymaterial.com मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयओगकडून घेण्यात येणाऱ्या राज्य सेवेच्या मुख्य परीक्षेमध्ये मोठे बदल करण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगा कडुन घेण्यात आला असुन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने MPSC ने त्यांचा www.mpsc.gov.in वर आणि सोशल मिडियाच्या माध्यमातून नविन बदल झालेले परिपत्रक जाहीर केले असून यामध्ये सामान्य अध्ययन आणि वैक्लपीक विषय असणार आहे. हे बदल राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२३ पासून लागू करण्यात येणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवेच्या पूर्व व मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम स्वतंत्ररित्या प्रसिद्ध करण्यात येईल. असे दिलेल्या प्रसिद्धपत्रकामद्धे जाहीर केले आहे.
MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा अभ्यास क्रमात मोठे बदल:-
मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहीर केलेल्या प्रसिद्ध पत्राकाप्रमाणे राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेच्या परीक्षेमध्ये योजना आणि अभ्यासक्रमामद्धे (syllabus) मध्ये तीन मोठे बदल केले आहे. ते आपण खाली सविस्तर पणे पाहूया.
MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा अभ्यास क्रमामध्ये कोणते आहे मोठे बदल:-
- राजयसेवेची मुख्य परीक्षा वर्णनात्मक स्वरूपाची असणार आहे. आणि एकुण नऊ पेपर असणार आहेत. त्यामध्ये भाषा पेपर एक मराठी, भाषा पेपर दोन इंग्रजी हे प्रत्येकी ३०० गुणांनचे विषय असणार आहे. दोन्ही पेपर २५ टक्के गुणांसह अर्हताकारी स्वरूपाचे असणार आहे. आणि मराठी किंवा इंग्रजी माध्यमातून निबंध, सामान्य अध्ययन १, सामान्य अध्ययन २, सामान्य अध्ययन ३, सामान्य अध्ययन ४, वैक्लपीक विषय पेपर क्रमांक १, वैक्लपीक विषय पेपर क्रमांक २ असे एकुण सात विषय प्रत्येकी २५० गुणांकरीता असतील. मुलाखाती करिता २७५ गुण असणार आहे. त्यामूळे मित्रांनो एकुण गुण २०२५ असणार आहेत. व या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी विचारामद्धे घेतली जाणार आहे.
- सामान्य अध्ययन १, सामान्य अध्ययन २, सामान्य अध्ययन ३ या पेपरकरिता आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्याशी संबंधित विषयांच्या अभ्यासक्रमामध्ये समावेश असणार आहे. तर सामान्य अध्ययन ४ हा पेपर उमेदवारांची नैतिकता, चारित्र्य व योग्यता या विषयावर राहणार आहे.
- एकुण २४ विषयामधून उमेदवारांना एक वैक्लिपक विषय निवडता येणार आहे. वैक्ल्पिक विषय पेपर क्रमांक १, वैक्ल्पिक विषय पेपर क्रमांक २ असे दोन पेपर असणार आहेत.
- MPSC Rajyaseva Mains Exam New Syllabus
👉👉MPSC Rajyaseva Mains Exam New Syllabus pdf Download
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२१ :-
0 Comments