अग्निपथ योजनेनुसार अग्निवीर Agniveer होण्याकरिता अशी असणार शारीरिक चाचणी
नमस्कार मित्रांनो !
mpscstudymatrial.com मध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो भारतीय सैन्याने अग्निपथ योजनेनुसार अग्निवीर म्हणुन सैन्यदलामध्ये भरती होण्याकरिता त्याची ऑनलाइन नोंदणी जुलै महिन्यामध्ये सुरू होणार असल्याचे जाहीर केलेल्या नोटिसमध्ये नमूद करण्यात आले असून त्याची आधीसूचना जाहीर केली आहे. यामध्ये पूर्वी सैन्य दलामध्ये शारीरिक चाचणी (Physical Test), वैदयकीय चाचणी (Medical Test), लेखी चाचणी (Written Test) व्हायची त्याप्रमाणे असणार आहे. या बद्दल सविस्तर माहिती आपण पुढील प्रमाणे पाहु या !
अग्निवीर करिता पद व वयोमर्यादा:-
- Agniveer (GD) All Arms पद साडे सतरा ते तेवीस वर्ष वयोमर्यादा
- Agniveer (Tech) पद साडे सतरा ते तेवीस वर्ष वयोमर्यादा
- Agniveer Tech (Aviation & Ammunition Examiner) पद साडे सतरा ते तेवीस वर्ष वयोमर्यादा
- Agniveer Clerk/Store Keeper Technicla (All Arms) पद साडे सतरा ते तेवीस वर्ष वयोमर्यादा
- Agniveer Tradsmen (All Arms) दहावी पास पद साडे सतरा ते तेवीस वर्ष वयोमर्यादा
- Agniveer Tradsmen (All Arms) आठवी पास पद साडे सतरा ते तेवीस वर्ष वयोमर्यादा
Physical Test (शारीरिक चाचणी):-
मित्रांनो यामध्ये सर्वप्रथम आपली ऊंची (Hight) आणि छाती (Chest) मोजण्यात येते. त्यामध्ये पात्र असणाऱ्या उमेदवाराची रनिंग घेण्यात येते. यात मित्रांनो 1600 मिटर (1.6 किलोमिटर) धावणे पहिल्या ग्रुपमध्ये म्हणजे ०५ मिनटे ३० सेकंदामध्ये पूर्ण केल्यास एकुण ६० गुण मिळणार आणि दुसऱ्या ग्रूप मध्ये म्हणजे ०५ मिनटे ३१ सेकंद ते ०५ मिनटे ४५ सेकंदमध्ये पूर्ण केल्यावर एकुण ४८ गुण मिळणार.
मित्रांनो रनिंग नंतर पुलप्स असणार आहेत यात मित्रांनो १० पुलप्स करिता ४० गुण असणार आहे. ०९ पुलप्स करिता ३३ गुण असणार आहे. ०८ पुलप्स करिता २७ गुण असणार आहे. ०७ पुलप्स करिता २१ गुण असणार आहे. ०६ पुलप्स करिता १६ गुण असणार आहे.
मित्रांनो पुलप्स नंतर ०९ फुट लांब उडी मारावी लागणार व त्यानंतर झिगझाग balansing धावावे लागणार आहे. त्यानंतर सुद्धा आपल्या इतर काही शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहेत.
Written Test (लेखी चाचणी):-
मित्रांनो शारीरिक चाचणी झाल्यानंतर जे उमेदवार लेखी चाचणी करिता पात्र होतील त्यांची लेखी चाचणी होणार आहे.
Medical Test (वैदयकीय चाचणी):-
मित्रांनो लेखी चाचणी झाल्यानंतर पात्र उमेदवारांची Medical Test (वैदयकीय चाचणी) घेतली जाणार आहे. यामध्ये भरतीच्या ठिकाणी विहित वैदयकीय मानकानुसार वैदयकीय चाचणी होणार आहे. यामध्ये अपात्र असणाऱ्या उमेदवारांना तज्ञज्ञानच्या पडताळणीकरिता लष्करी रुग्णालयात पाठवण्यात येणार आहे. उमेदवारांना रेफरलच्या पाच दिवसांच्या आत संबंधित लष्करी रुग्णालयात अहवाल द्यावा लागेल व १४ दिवसांच्या आत रुग्णालयाद्वारे पुनरावलोकन वैदयकीय चाचणी होणार आहे.
0 Comments