माझ्या विद्यार्थीमित्रांनो आपले mpscstudymaterial.com यामध्ये स्वागत आहे.
महाराष्ट्र राज्य सरकारने मा. जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गतच्या आस्थापनेवरील तलाठी (गट - क) संवर्गाची दिनांक ३१/१२/२०२० अखेर रिक्त असलेली सर्व महसुली विभाग मिळून राज्यातील एकूण - १०१२ रिक्त पदे भरण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. २०२२ या वर्षाच्या तलाठी पद भरती ची कार्यपद्धती स्वतंत्ररित्या नंतर कळविण्यात येईल. असे पत्राव्दारे कळविल्यावरून विद्यार्थी-मित्रांनो तलाठी पदभरती - २०२२ मध्ये निघणार आहे. त्या करिता मित्रांनो आपण तलाठी पदभरती च्या तयारीला लागणे आवश्यक आहे.
माझ्या मित्रांनो आज अशी व्यवस्था झाली आहे की सरकारी नोकरी मिळणे कठीण झाले आहे. कारण दिवसेंदिवस बेरोजगारी वाढत चालली आहे. आणि कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये स्पर्धा ही वाढत चालली आहे.या करिता आपण जिद्दीने तलाठी पदभरती - २०२२ च्या अभ्यासच्या मागे लागून आपले सरकारी नौकरी चे स्वप्न पुर्ण करू शकता. तुमच्या स्वप्नांना पूर्ण करण्याकरिता आम्ही सुद्धा आपल्या मदतीला तयार आहोत.तुम्हाला जर परीक्षेचा सराव करताना मदतीची गरज पडल्यास आम्हाला सांगा.
माझ्यामित्रांनो आम्ही आपल्या करिता तलाठी पदभरती - २०२२ च्या संबंधित प्रश्न-उत्तरच्या स्वरूपामध्ये अगदी मोफत विनामूल्य कोणत्याही प्रकारची फी न भरता ऑनलाइन पद्धतीने आपल्या सोबत आहोत.
तर चला तर माझ्या मित्रांनो! आपण सर्व प्रथम तलाठी पदभरती - २०२२ (TALATHI EXAM 2022 SYLLABUS) च्या अभ्यासक्रमाची खाली दिलेली माहिती घेऊया.
अ. क्र. | विषय चे नाव | प्रश्न संख्या | प्रत्येक प्रश्नाला असणारे गुण | एकूण गुण | एकूण वेळ |
१ | मराठी व्याकरण | २५ प्रश्न | ०२ गुण | ५० गुण | एकूण ०२ तास |
२ | इंग्रजी व्याकरण | २५ प्रश्न | ०२ गुण | ५० गुण | |
३ | जनरल नॉलेज आणि current affairs | २५ प्रश्न | ०२ गुण | ५० गुण | |
४ | अंकगणित व बुद्धिमत्ता | २५ प्रश्न | ०२ गुण | ५० गुण | |
एकुण | १०० प्रश्न | - | २०० गुण |
माझ्या मित्रांनो वर तकत्या मध्ये दिलेल्या विषयानुसार २५-२५ प्रश्ननानंमध्ये पेपर मध्ये बदलही होऊ शकतो. उदाहरणार्थ मराठी व्याकरणचे १५ प्रश्न,इंग्रजी व्याकरणाचे १५ प्रश्न,अंकगणितचे २० प्रश्न,सामान्य ज्ञान(जनरल नॉलेज) चे ५० प्रश्न असे एकूण १०० प्रश्न
माझ्या मित्रांनो आपण वर तक्त्याप्रमाणे विषयानुसार प्रश्नांची संख्या पाहली. आता वरील विषयानुसार पेपरामद्धे येणारी माहिती पाहु.
मराठी व्याकरण :-
यात मित्रांनो आपल्याला समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, काळ व काळाचे प्रकार, शब्दांचे प्रकार नाम, सर्वनाम, क्रिया विशेषण,क्रिया विशेषण अव्यय, क्रियापद, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवलप्रयोगी अव्यय,विशेषण, विभक्ती, संधी, संधी चे प्रकार, प्रयोग, वाक्याचे प्रकार, वाक्यरूपांतर, समास, अलंकार, वृत्ते, शब्दसिद्धी, वाक्यपृथकरण, सिद्ध व साधित शब्द, आणि शब्दांच्या शक्ति, विराम चिन्ह, शुद्ध लेखन, अशुद्ध-शुद्ध शब्द, म्हणी, वाक्यप्रचाराचा अर्थ आणि उपयोग, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, समूह दर्शक शब्द, व ध्वनिदर्शक शब्द, ध्वन्यार्थ,अलंकारिक शब्द, साहित्यिक व त्यांची टोपण नावे, काव्य ग्रंथ व कवि, महानुभाव पंथ यांची साती ग्रंथ, मराठी मधील पाच संत कवी, मराठी पंडित कवी, साहित्य व साहित्यकार, पारी भाषिक शब्द इत्यादि घटकावर मित्रांनो प्रश्न विचारण्यात येतात.
इंग्रजी व्याकरण :-
या मध्ये मित्रांनो आपल्याला Synonyms, Antonyms, Vocabulary, Word Substitution, Proverbs, Preposition, Words Followed By Particular Prepositions, Tense, kind of Tense, sentence structure, Common error, Article, Noun, Verb, question tag, spot the error,verbal comprehension passage,one word substitutions, Adverb, Adjective, phrases, spellings etc घटकावर मित्रांनो प्रश्न विचारण्यात येतात.
जनरल नॉलेज आणि current affairs :-
या मध्ये मित्रांनो आपल्याला भारताचा आणि महाराष्ट्राचा इतिहास, भारतीय संस्कृति, रसायनशास्त्र, जीवशास्त्र,भौतिकशास्त्र, महाराष्ट्रातील समाज सुधारक, पंचायत राज आणि राज्यघटना तसेच मित्रांनो चालू घडामोडी (current affairs) सामाजिक, राजकीय, आर्थिक, क्रीडा, मनोरंजन,नवीन प्रकाशित पुस्तक,महत्वाचे दिवस आणि इतर घडामोडी इत्यादि घटकावर प्रश्न विचारण्यात येतात.
अंकगणित व बुद्धिमत्ता :-
या मध्ये मित्रांनो आपल्याला बेरीज,वजाबाकी,गुणाकार,भागाकार,काळ काम वेग,सरासरी, चलन,घड्याळ मापनाची परिमाणे तसेच बुद्धिमता मध्ये अंकमालिका, अक्षरमाला, वेगळा शब्द, समसंबंध, निष्कर्ष, आकृती इत्यादि घटकावर प्रश्न विचारण्यात येतात.
मित्रांनो वरील घटकावर आपला सराव व्हावा या हेतूने आम्ही आपल्याला दररोज तलाठी पदभरती - २०२२ ची परीक्षा येई पर्यन्त Talathi bharti 2022 online free mock test च्या स्वरूपामध्ये current affairs च्या घटकावर व दररोज सरावा करिता वरील विषयावर २० प्रश्न pdf मध्ये दिली आहेत. तेसुद्धा आपण Download करू शकता.
0 Comments